Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » कर्जबुडव्या कंपन्यांसाठी बाजारपेठेत ‘नो एंट्री’

कर्जबुडव्या कंपन्यांसाठी बाजारपेठेत ‘नो एंट्री’

=सेबीचे कठोर पाऊल, अनेक पदांवरून विजय माल्या बाहेर होणार=
SEBI1नवी दिल्ली, [१२ मार्च] – बँकांकडून मोठमोठे कर्ज घेतल्यानंतर ते हेतुपुरस्सर बुडविणार्‍या कंपन्यांना देशातील बाजारपेठांवर नियंत्रण ठेवणार्‍या सेबीने आज शनिवारी जोरदार दणका दिला. अशा कंपन्यांकरिता बाजारपेठांची दारे कायमची बंद करतानाच, शेअर बाजार किंवा रोखे बाजाराच्या माध्यमातून निधी उभारण्यावरही सेबीने बंदी घातली आहे. इतकेच नव्हे, तर कर्जबुडव्या कंपन्या यापुढे कोणत्याही नामांकित कंपन्यांच्या संचालक मंडळावरही नियुक्त होऊ शकणार नाहीत. सेबीच्या या आदेशामुळे मद्यसम्राट विजय माल्या विविध कंपन्यांच्या मंडळांवरून आपोआपच अपात्र ठरणार आहे.
सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील विविध बँकांचे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडविणारे आणि विदेशात पळ काढणारे किंगफिशर एअरलाईन्सचे सर्वेसर्वा विजय माल्या यांच्या प्रकरणामुळे सेबीने हा कठोर फतवाच जारी केला असल्याचे सेबीच्या उच्चस्तरीय सूत्राने सांगितले. अशा कर्जबुडव्या कंपन्या आता म्युच्युअल फंड किंवा ब्रोकरेज फर्म यासारख्या कंपन्याही स्थापन करण्यासाठी पात्र राहणार नाहीत. सोबतच, अन्य नामांकित कंपन्यांच्या व्यवस्थापनाची सूत्रेही त्यांना आपल्या हाती घेता येणार नाही.
सेबीच्या आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर सेबीचे अध्यक्ष यु. के. सिन्हा यांनी पत्रपरिषदेत याबाबतची माहिती दिली. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही सेबीच्या बैठकीला संबोधित केले. देशातील कोणकोणत्या कंपन्यांनी बँकांचे कर्ज जाणीवपूर्वक बुडविले, त्या कंपन्यांची यादी तयार करून त्यांना काळ्या यादीत टाकण्यात येईल. याबाबतची अधिसूचना लवकरच जारी करण्यात येणार असून, त्यानंतर कर्जबुडव्या कंपन्या आणि व्यक्ती शेअर बाजार तसेच रोखे बाजारातून आपोआपच हद्दपार होतील, असेही सिन्हा यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27262

Posted by on Mar 13 2016. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय (680 of 2453 articles)


=२०१० च्या प्रतिज्ञापत्रात माल्यांनी दिली होती माहिती= नवी दिल्ली, [१२ मार्च] - सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील अनेक बँकांचे नऊ हजार ...

×