Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » काँग्रेसला योगात दिसला तमाशा

काँग्रेसला योगात दिसला तमाशा

=अशीही मानसिकता=
Sonia_Rahulनवी दिल्ली, [२१ जून] – संपूर्ण जगाने आज रविवारी योगदिन उत्साहाने साजरा केला. योग केल्यानंतर आम्हाला खरोखरच ताजेतवाने आणि मन प्रफुल्लित वाटत असल्याच्या प्रतिक्रियाही जगाच्या कानाकोपर्‍यातून आल्या. पण, देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या कॉंगे्रसला मात्र आंतरराष्ट्रीय योगदिनातही राजकीय तमाशाच दिसून आला आहे.
नरेंद्र मोदी सरकारने आयोजित केलेला योगदिनाचा कार्यक्रम म्हणजे निव्वळ तमाशा आणि ढोंग असल्याची मुक्ताफळे कॉंगे्रसचे वादग्रस्त सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी उधळली आहे. विशेष म्हणजे कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी हे दोघेही योगदिनाच्या पूर्वसंध्येला विदेशात गेले आहेत.
एकीकडे जगभरात आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा होत असताना युवक कॉंग्रेसने मोर्चा काढून ललित मोदी प्रकरणावरून मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. तर, मी सर्वांना आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या शुभेच्छा देतो. मात्र, सामूहिक योगाचा हा प्रकार म्हणजे जनतेच्या पैशाची उधळपट्टी आहे आणि केवळ नरेंद्र मोदी यांची प्रतिमा चमकविण्याचा यामागील उद्देश आहे, असे ट्विट दिग्विजय सिंह यांनी केले.
राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनीही ट्विटरचा आधार घेत, योग ही वैयक्तिक बाब आहे. योग प्रचार आणि प्रसाराच्या माध्यमातून मोदी सरकार आपला प्रचार करीत आहे. हा शरीराला स्वस्थ बनवणारा नव्हे, तर राजकीय योग आहे, असे म्हटले आहे. आपल्या देशात कोट्यवधी लोक उपाशी झोपतात. रिक्षा चालविणार्‍याला योग करण्याची गरज काय, जो दिवसभर शारीरिक श्रम, मजुरी करून थकतो, त्याला योग करण्याची आवश्यकताच नाही, असेही लालूंनी म्हटले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23059

Posted by on Jun 22 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1610 of 2453 articles)


=रस्ते वाहतूक विषयक करार= नवी दिल्ली, [१६ जून] - भारताने बांगला देश, भुतान आणि नेपाळसोबत रस्ते वाहतूक विषयक करार केला ...

×