Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » काँग्रेसवर ललित‘बॉम्ब’

काँग्रेसवर ललित‘बॉम्ब’

  • प्रियंका, रॉबर्ट वढेरांना लंडनमध्ये भेटलो
  • ललित मोदीच्या आरोपामुळे नवे वादळ

lalit-priyanka-robertनवी दिल्ली, [२६ जून] – आयपीएल घोटाळेबाज ललित मोदीच्या आरोपाचा आधार घेऊन सुषमा स्वराज आणि वसुंधरा राजे यांचा राजीनामा मागणारा काँग्रेस पक्ष आज शुक्रवारी स्वत:च अडचणीत सापडला आहे. गेल्यावर्षी लंडनमध्ये प्रियंका गांधी-वढेरा आणि त्यांचे पती रॉबर्ट वढेरा यांची भेट घेतली होती. त्यांच्याजवळ माझा मोबाईल क्रमांकही आहे, असा ट्विटरबॉम्ब ललित मोदीने टाकला. यामुळे ‘ललितवादा’ला आता नवे वळण मिळाले आहे.
प्रियंका आणि रॉबर्ट वढेरा या दोघांसोबतही माझे चांगले संबंध आहेत. गेल्यावर्षी हे दोघेही लंडनमध्ये असताना, एका रेस्टॉरेन्टमध्ये मी त्यांची वेगवेगळी भेट घेतली होती. आमची भेट झाली, त्यावेळी कॉंगे्रस पक्ष केंद्रात सत्तेवर होता. आमच्या या भेटीत टिमी सरनाही होते. त्यांच्याकडे माझा मोबाईल क्रमांक आहे. ते मला केव्हाही कॉल करू शकतात. मला नेमके काय वाटते, हे त्यांना मी सांगू शकेल. प्रियंका व रॉबर्टशी मला बोलायचे आहे. मला त्यांच्याशी कुठलाही सौदा करायचा नाही. त्यांना स्पष्ट शब्दात काहीतरी सांगायचे आहे. एखाद्याला विनाकारण लक्ष्य केल्यावर त्याची अवस्था काय होते, हेच त्यांना मला सांगायचे आहे,’ असेही मोदीने ट्विटरवर नमूद केले आहे.
सोनियांनी स्पष्टीकरण द्यावे : भाजपा
ललित मोदीच्या आरोपावरून भाजपाला लक्ष्य करणार्‍या कॉंगे्रस पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आता ललिता मोदीच्या नव्या खुलाशावर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी भाजपाने केली आहे. जो घोटाळेबाज प्रियंका आणि रॉबर्ट वढेरांची भेट घेऊ शकतो, त्याचे गांधी घराण्याशीही जवळचे संबंध असायलाच हवे. ललित मोदीचे प्रकरण संपुआ सरकारच्याच काळातील असल्याने त्याला भारताबाहेर जाण्यासाठी गांधी घराण्यानेच मदत केली असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. ललितसोबत गांधी घराण्याचे काय संबंध आहेत, हे देशाला समजायलाच हवे, असे भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
संपुआ सरकारच्या काळात ललित मोदीला भारताच्या स्वाधीन करण्याची तयारी ब्रिटनने दर्शविली होती. पण, तत्कालीन अर्थमंत्री पी. चिदम्बरम् यांनीच त्यास विरोध केला होता. हे प्रकरण १० जनपथ येथूनच सुरू झाले आणि तिथेच संपेल, असेही पात्रा पुढे म्हणाले. ललित मोदी प्रकरण आता आपल्यावर उलटले असल्याचे पाहून कॉंगे्रस पक्ष आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. ललित मोदीच्या ट्विटरबॉम्बच्या पार्श्‍वभूमीवर गांधी घराण्याचा बचाव करताना, कॉंगे्रसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सूरजेवाला म्हणाले की, रस्त्यावर किंवा एखाद्या हॉटेलात एखाद्या व्यक्तीची भेट घेणे हा काही गुन्हा नाही. ललित मोदी हा भाजपाच्याच इशार्‍यावर असे आरोप करीत आहे. भाजपाने विशेषत: केंद्र सरकारने सुषमा स्वराज आणि वसुंधरा राजे यांच्यावर झालेल्या आरोपांवर स्पष्टीकरण द्यावे. आपले अपयश झाकण्यासाठी भाजपा अशाप्रकारचे राजकीय डावपेच खेळत आहे.
कॉंगे्रस सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनीही, ललित मोदी भाजपाच्याच इशार्‍यावर गांधी घराण्याला बदनाम करीत असल्याचा आरोप केला. ललित मोदीने प्रियंका गांधी आणि तिच्या पतीची कुठेतरी एखाद्या हॉटेलात भेट घेतली, याचा अर्थ त्यांनी त्याला भारतातून पळ काढण्यासाठी मदत केली, असा मुळीच होत नाही. आपल्यावरील आरोप कॉंगे्रसवर, विशेषत: गांधी घराण्यावर ढकलण्यासाठीच भाजपा असे करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23100

Posted by on Jun 27 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1604 of 2453 articles)


=लालूप्रसाद यादव यांची भूमिका= नवी दिल्ली, [२६ जून] - केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या पदवीविषयीचा वाद न्यायालयात पोहोचला ...

×