Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » कारसेवकांवर गोळीबाराचा आदेश ही चूकच

कारसेवकांवर गोळीबाराचा आदेश ही चूकच

=‘त्या’ घटनेचे दु:ख अजूनही वाटते: मुलायमसिंह यांची कबुली=
Mulayam-Singh-Yadav_1लखनौ, [२५ जानेवारी] – अयोध्येतील बाबरी मशिद विध्वंसाच्या काळात कारसेवकांवर गोळीबाराचा आदेश देऊन मी फार मोठी चूक केली होती. १६ लोकांचा बळी घेणार्‍या या घटनेचे दु:ख मला अजूनही वाटते. माझा तो निर्णय क्लेशदायक असाच होता, अशी कबुली समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांनी आज सोमवारी येथे दिली.
समाजवादी नेते कर्पूरी ठाकूर यांच्या जयंतीनिमित्त लखनौ येथे आयोजित सपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मुलायमसिंह यादव बोलत होते. अयोध्येतील धार्मिक स्थळाची सुरक्षा करणे आवश्यक असल्याने गोळीबाराचे आदेश देण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय माझ्यापुढे नव्हता. या आदेशाचे मला अजूनही दु:ख आहे, असे त्यांनी सांगितले.
लोकसभेतील तत्कालीन विरोधी पक्षनेते अटलबिहारी वाजपेयी यांनी जेव्हा संसदेत हा मुद्दा उपस्थित केला होता, तेव्हा गोळीबार करणे आवश्यक झाले होते, पण एक धार्मिक स्थळ वाचविण्यासाठी कितीतरी जीव जाऊ शकतात, हा विचार गोळीबाराचे आदेश देताना माझ्या मनात आला नव्हता, हेच उत्तर मी दिले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
माफी मागा : भाजपा
गोळीबाराचा आदेश दु:खद होता, असे सांगून भागणार नाही आणि त्या कारसेवकांच्या कुटुंबीयांचे दु:खही कमी होणार नाही. १६ कारसेवकांचा बळी घेण्याच्या त्या आदेशासाठी मुलायमसिंह यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजपाने केली. कारसेवकांवर गोळीबाराचा आदेश अमानवीय असाच होता आणि त्यासाठी माफी मागणे हाच एकमेव पर्याय आहे, असे भाजपाचे प्रवक्ते विजय बहादूर पाठक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26634

Posted by on Jan 27 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (876 of 2453 articles)


नवी दिल्ली, [२५ जानेवारी] - आगामी काळात एटीएममधून पैसे काढणे महागणार आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) सरकारला याबाबत ...

×