Home » ठळक बातम्या, मुंबई-कोकण » काळाबाजार करणार्‍यांवर मोक्का लावणार

काळाबाजार करणार्‍यांवर मोक्का लावणार

Girish-Bapatमुंबई, [२० ऑक्टोबर] – डाळ माफियांविरूद्ध सरकारने सुरू केलेल्या जोरदार कारवाईत आज मंगळवारी एकाच दिवसात २७० ठिकाणी धाडी घातल्या गेल्या, ज्यात हजारो क्विंटल डाळीची साठेबाजी पकडली गेली असून, नाशिक व पुण्यात प्रत्येकी एका साठेबाजावर महाराष्ट्र घातक कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये (एम.पी.डी.ए.) गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. साठेबाजीत सापडलेली डाळ जप्त करण्याबरोबरच मोक्कांतर्गत गुन्हे नोंदविण्याचे आदेश तातडीने जारी केले गेले आहेत. सर्वाधिक १५० धाडी पुण्यात टाकण्यात आल्या आहेत.
राज्यभरात सुरू असलेल्या या कारवाईची माहिती आज मंगळवारी अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी पत्रपरिषदेत दिली. व्यापार्‍यांसोबतच मोठे मॉल आणि कंपन्यांवरही धाडी घालण्याचे आदेश दिले आहेत. गिरीश बापट यांनी सांगितले की, कुणाचाही मुलाहिजा ठेवला जाणार नाही. नागरिकांना योग्य दारात डाळ, तेल आणि तेलबिया मिळाले पाहिजे, यासाठी सरकारने दर निरीक्षण कक्ष तयार केला असून, राज्यभरातील बाजारात सरकार हस्तक्षेप करण्यास तयार आहे. जप्त केलेली डाळ तातडीने बाजारात यावी म्हणून जिल्हाधिकार्‍यांना जप्त डाळीचा लिलाव करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.
डाळमाफियांविरूद्ध धाडसत्र सुरू झाल्याची बातमी सर्वप्रथम दोन दिवसांपूर्वी तरुण भारतने दिली होती. राज्याचे विविध विभाग समन्वयाने ही कारवाई करीत असून, डाळीचे कृत्रिमरित्या वाढवले गेलेले बाजारभाव उतरण्यास लगेच सुरुवात झाल्याने सरकारची कारवाई योग्य दिशेने सुरू असल्याचे दिसते आहे.
आज एका दिवसात ३० रुपये किलोने दर उतरले आहेत. याच जोडीने केंद्राने पाच हजार क्विंटल तूर डाळ तातडीने आयात केली आहे. येत्या तीन ते चार दिवसांत ही डाळ भारतात येईल आणि त्यापुढच्या तीन-चार दिवसात ती बाजारात उपलब्ध होईल, अशी चिन्हे आहेत. जगात भारत सोडून अन्य देशात तूर डाळ फार कोणी खात नसल्याने परदेशात तूर डाळ स्वस्तात उपलब्ध असल्याची माहितीही बापट यांनी दिली.
केंद्राकडून व्यापार्‍यावर सरसकट कारवाईची परवानगी मिळविण्यासाठी राज्य सरकारचे दोन उच्च अधिकारी दिल्लीत ठाण मांडून बसले असल्याची माहितीही बापट यांनी दिली. सणासुदीच्या दिवसात नागरिकांना स्वस्त डाळ उपलब्ध व्हावी म्हणून शिधा वाटप यंत्रणेतून विविध प्रकारच्या डाळी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात आला असून, त्यावर अर्थखात्याचे मत मागवण्यात आले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25222

Posted by on Oct 21 2015. Filed under ठळक बातम्या, मुंबई-कोकण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मुंबई-कोकण (1311 of 2452 articles)


=भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते जीव्हीएल नरसिंहराव यांची मागणी= नवी दिल्ली, [२० ऑक्टोबर] - कॉंग्रेस आणि भ्रष्टाचार हे समानार्थी शब्द झाले असून, ...

×