Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » काळा पैसा धारकांची नावे आज जाहीर

काळा पैसा धारकांची नावे आज जाहीर

swissaccounts1नवी दिल्ली, [९ फेब्रुवारी] – स्वित्झर्लंडमधील एचएसबीसी या खाजगी बँकेने जगातील २०० देशांमधील खातेधारकांची नावे उघड केली आहेत. त्यापैकी ११९५ भारतीय खातेदार असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. यापैकी सुमारे ६० खातेधारकांची नावे केंद्र सरकार आज उघड करणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ही नावे २००६-०७ मधील दस्ताऐवजातील असून या गौप्यस्फोटाला ‘स्विसलिक’ असे नाव दिले आहे. भारतातील उद्योग आणि राजकारणातील काही नेते त्यांचे नातेवाईक, बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्री तसेच काही हिरेव्यापारी यांची नावे यादीत असल्याची कुणकुण लागली आहे. या बँकेत भारतीय खातेदारांच्या नावे तब्बल २५ हजार ४२० कोटींची माया असल्याचे उघड झाले आहे. कर चुकवून परदेशात काळा पैसा ठेवल्याप्रकरणी यांच्यावर कारवाई करण्यात येण्याची शक्यता आहे. या कारवाईदरम्यान सरकारकडून या खातेधारकांच्या नावाचा खुलासा केला जाण्याची दाट शक्यता आहे. काळया पैशासंदर्भात सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.
यासंदर्भात प्राप्तीकर विभागाचा तपास पूर्ण झाला आहे. एसआयटीच्या आदेशानुसार या सर्वांवर आरोपीचा खटला दाखल करण्यात आला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20469

Posted by on Feb 10 2015. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय (2078 of 2453 articles)


=चीनलाही टाकले मागे= नवी दिल्ली, [९ फेब्रुवारी] - चालू आर्थिक वर्षाच्या ३१ डिसेंबरला संपलेल्या तिसर्‍या तिमाहीत भारताचा विकास दर ७.५ ...

×