काळ्या पैशाच्या शोधासाठी भारताला पूर्ण सहकार्य
Monday, February 9th, 2015= स्विस सरकारची ग्वाही=
बर्न/नवी दिल्ली, [८ फेब्रुवारी] – काळा पैसा साठविणार्या खातेदारांची माहिती प्राप्त करण्यासाठी भारत सरकार स्वित्झर्लंडवर प्रचंड दबाव टाकत असताना आणि याच मुद्यावरून दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला असतानाच, काळ्या पैशाच्या शोधात आम्ही भारताला सर्वतोपरी सहकार्य करीत असल्याची ग्वाही स्विस प्रशासनाने दिली आहे.
चोरीला गेलेल्या माहितीच्या आधारे भारतातील काळा पैसाधारकांची माहिती सादर करण्यास स्विस प्रशासनाने नकार दिल्यानंतर भारताने या देशावर प्रचंड दबाव आणला होता. सध्या दोन्ही देशांमधील संबंध तणावाचे आहेत. अनेक मुद्यांवरून आमच्यात मतभेदही निर्माण झाले आहेत. पण, चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्यासाठी आमचे दार सदैव खुले आहे, या देशाच्या सरकारने स्पष्ट केले. अमेरिका, फ्रान्स आणि इटलीप्रमाणेच भारतही आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा भागीदार आहे. गेल्या वर्षी करविषयक मुद्यांवर आम्ही भारताला आवश्यक ते सर्वच सहकार्य केले होते. आताही आम्ही काळ्या पैशाचा शोध घेण्याच्या मोहिमेत भारताला सर्वतोपरी सहकार्य करीत आहोत, असेही स्विस सरकारने म्हटले आहे.
दरम्यान, गेल्या महिन्यात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जागतिक आर्थिक फोरमच्या वार्षिक बैठकीच्या पार्श्वभूमीवर स्विसचे अर्थमंत्री एव्हेलिन विदमेर यांची भेट घेऊन काळ्या पैशावरील सहकार्याच्या मुद्यावर सविस्तर चर्चा केली होती.
Short URL: https://vrittabharati.in/?p=20431

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!