Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद » काळ्या पैशावरील विधेयक आज लोकसभेत?

काळ्या पैशावरील विधेयक आज लोकसभेत?

loksabhaनवी दिल्ली, [१९ मार्च] – विदेशात जमा केलेला पैसा आणि संपत्तीची माहिती न देणे हा सत्यविधान गुन्हा ठरविण्यासह दहा वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद असलेले काळ्या पैशाविषयीचे विधेयक उद्या शुक्रवारी लोकसभेत सादर केले जाण्याची दाट शक्यता आहे.
देशविदेशात बेनामी संपत्ती असलेल्यांना ती उघड करण्यासाठी थोडा कालावधी देण्याचीदेखील या विधेयकात तरतूद आहे. तसेच बेनामी संपत्ती असल्यास ती जाहीर करून दंड भरायचा आणि दंडात्मक कारवाई टाळता येईल, अशीही सोय या विधेयकात करण्यात आली आहे. अर्थ मंत्रालयातील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार ‘द अनडिसक्लोजड फॉरेन इन्कम ऍण्ड ऍसेट्‌स (इम्पोजिशन ऑफ न्यू टॅक्स) बिल, २०१५’ हे विधेयक उद्या शुक्रवारी लोकसभेत सादर केले जाऊ शकते. शुक्रवार हा संसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यातील शेवटचा दिवस असला तरी महत्त्वाची विधेयके पारित करण्यासाठी अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याचा कालावधी दोन दिवसांनी वाढविला जाण्याची शक्यता सूत्राने व्यक्त केली आहे. सभागृहाच्या पटलावर सादर केल्यानंतर पारित करण्यापूर्वी हे विधेयक संसदीय समितीकडे पाठविले जाऊ शकते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21599

Posted by on Mar 20 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संसद (1873 of 2453 articles)


=सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा= नवी दिल्ली, [१९ मार्च] - सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या एका निर्णयानुसार जर तुम्ही एनईटी (नेट) किंवा एसएलईटी ...

×