Home » अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या » काळ्या पैशावर पनामाची गोपनीय कागदपत्रे लीक

काळ्या पैशावर पनामाची गोपनीय कागदपत्रे लीक

NOSSACK FONSECAनवी दिल्ली, [४ एप्रिल] – जगातील अतिश्रीमंत उद्योगपती, राजकारणी आणि सत्ताधीश यांनी आपला काळा पैसा कसा परदेशी पाठवला याचा जगभरातील अनेक पत्रकारांनी मिळून या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. मुख्य म्हणजे पत्रकारितेच्या इतिहासातील हा सर्वात मोठा गौप्यस्फोट मानला जात आहे. या यादीत अनेक सेलिब्रिटी तसेच महत्वपूर्ण व्यक्तिंचा समावेश आहे.
पनामा येथील एका लॉ फर्मचे काही गोपनीय कागदपत्रे लीक करण्यात आली आहेत. तब्बल एक कोटी दहा लाख पानांचे गोपनीय दस्तावेज या शोध पत्रकारांच्या हाती लागले आहेत. जगभरातील अनेक पत्रकार गेल्या वषभरापासून या मोहिमेवर काम करत होते. मोसेक फोन्सेका आपल्या ग्राहकांना काळा पैसा पांढरा करण्यासाठी तसेच नियमांमधून वाचविण्यासाठी आणि करातून सूट मिळावी यासाठी कशी मदत करायची ही माहिती या कागदपत्रांमधून समोर आली आहे.
भारतीयांना परदेशात कुठलीही कंपनी स्थापन करण्याचा अधिकार नाही. परंतु २००४ साली नागरिकांना २५००० डॉलरपर्यंत रक्कम परदेशात पाठविण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र ही परवानगी मिळण्याआधीच अनेक भारतीयांनी परदेशात कंपन्या स्थापन केल्याचे माहितीतून समोर आले आहे. यासाठी २३४ भारतीय पासपोर्ट सादर करण्यात आले आहेत.
या यादीत रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन, युक्रेनचे अध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को, इजिप्तचे माजी अध्यक्ष होस्नी मुबारक सिरीयाचे अध्यक्ष बशर अल असाद यांचा समावेश आहे. तसेच यात ५०० भारतीयांचे नावे आहेत. त्याचबरोबर पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांचे कुटुंबीय, आईसलँडचे पंतप्रधान, सौदी अरेबियाचे राजे आणि त्यांचे कुटुंबीय यांचाही या पनामा पेपर्समध्ये उल्लेख आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27724

Posted by on Apr 5 2016. Filed under अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अमेरिका, आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या (524 of 2458 articles)


नवी दिल्ली, [४ एप्रिल] - पाच राज्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत बंगाल व आसाममध्ये आज सोमवारी झालेल्या पहिल्या टप्प्यात अतिउत्साहात ...

×