Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » काश्मिरातील शाळा, लष्करी तळ तोयबाच्या रडारवर

काश्मिरातील शाळा, लष्करी तळ तोयबाच्या रडारवर

=गुप्तचर यंत्रणांचा इशारा=
jammu-kashmir-map-6नवी दिल्ली, [२१ नोव्हेंबर] – पाकपुरस्कृत लष्कर-ए-तोयबा ही दहशतवादी संघटना जम्मू-काश्मिरातील शाळा, लष्करी तळं आणि सीमा सुरक्षा दलाच्या तळांवर मोठे हल्ले करण्याच्या तयारीत आहे, असा इशारा केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी आज शनिवारी दिला.
आठ ते नऊ अतिरेक्यांनी गेल्या महिन्यात भारतात घुसखोरी केली होती. चार अतिरेक्यांचा एक गट शौकर नावाच्या अतिरेक्याच्या नेतृत्वात काश्मिरातील तिब्बा, टिला आणि तिकरी येथे आत्मघाती हल्ला करण्याच्या तयारीत आहे. गेल्या १५ दिवसांपासून हे अतिरेकी पी. व्ही. चपरार या भागात एका गुप्त ठिकाणी आश्रयास आहे. तोयबाचा कमांडर इरफान तांडेवाला याच्यावर या अतिरेक्यांना सहकार्य करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, असे यात म्हटले आहे.
या सर्व अतिरेक्यांजवळ स्वयंचलित शस्त्रे असून, त्यांनी सीमावर्ती भागांची टेहळणीही केली आहे. यात प्रामुख्याने लष्कर व बीएसएफच्या सीमावर्ती छावण्या आणि नद्यांचा समावेश आहे. पाकव्याप्त काश्मिरात पाकिस्तानी सैनिकांच्या आश्रयात असलेल्या अन्य अतिरेक्यांच्या भारतातील घुसखोरीचा मार्ग सुकर करण्यासाठी हे अतिरेकी प्रयत्नात असल्याचेही गुप्तचर यंत्रणांनी स्पष्ट केले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25627

Posted by on Nov 22 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (1189 of 2453 articles)


=जप्त तूर डाळीच्या साठ्यांचा जाहीर लिलाव होणार= मुंबई, [२० नोव्हेंबर] - राज्यात गेल्या काही दिवसांत जप्त करण्यात आलेली तूर आणि ...

×