Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » काश्मिरातील हिंसाचारामागे पाकच

काश्मिरातील हिंसाचारामागे पाकच

=राजनाथसिंह यांचा स्पष्ट आरोप=
RAJNATH SINGHशाहजहानपूर, [२० ऑगस्ट] – अतिरेकी कमांडर बुरहान वाणीच्या खात्म्यानंतर काश्मीर खोर्‍यात जो हिंसाचार सुरू आहे, त्यामागे केवळ पाकिस्तानचाच हात आहे. खोर्‍यातील शांतता प्रक्रिया विस्कळीत करण्याचा चंगच जणू पाकने बांधला आहे, असा स्पष्ट आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी आज शनिवारी येथे केला.
काश्मिरात अस्थिरता निर्माण करण्याची एकही संधी पाकिस्तान सोडत नाही, असे सांगताना आज मला मुळीच गैर वाटत नाही. काश्मीर खोरे हिंसाचाराने नेहमीच पेटत राहावे, हीच पाकची इच्छा आहे, असे राजनाथसिंह यांनी तिरंगा रॅलीला संबोधित करताना सांगितले.
याच महिन्याच्या सुरुवातीला मी पाकला भेट दिली होती. त्यावेळी त्या देशाने कोणता खोडसाळपणा केला होता, याची माहिती आपल्या सर्वांनाच आहे. तो प्रकार पुन्हा सांगायची माझी इच्छा नाही. पण, एवढे मात्र खरे की, भारताच्या गौरवाला त्या देशात धक्का बसेल, हे मी कदापि मान्य करणार नाही, असे स्पष्ट करताना राजनाथसिंह म्हणाले की, काश्मिरी जनतेला मला एवढेच सांगायचे आहे की, आम्ही केवळ काश्मिरी भूमीवरच नव्हे, तर तिथे राहणार्‍या नागरिकांवरही मनापासून प्रेम करतो. त्यांच्या हातात दगड, विटा आणि शस्त्रं नव्हे, तर पेन, संगणक आणि नोकरी पाहण्याची आमची इच्छा आहे. प्रत्येक काश्मिरी युवकाच्या हाताला रोजगार देण्याचा आमचा निर्धार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29238

Posted by on Aug 21 2016. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (109 of 2453 articles)


=भारताच्या समर्थनार्थ नारेही लागले= इस्लामाबाद, [२० ऑगस्ट] - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी आपल्या भाषणात बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैनिकांच्या अत्याचाराचा मुद्दा ...

×