Home » ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य » काश्मिरात बंदकाळात हिंसाचार

काश्मिरात बंदकाळात हिंसाचार

=मसरत ‘देशद्रोही’च, गुन्हा दाखल, गोळीबारात हुर्रियतचा कार्यकर्ता ठार=
jkclashesश्रीनगर, [१८ एप्रिल] – गेल्या बुधवारी हुर्रियत कॉन्फरन्सच्या रॅलीत पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देऊन पाकचा झेंडा फडकविणारा जहाल फुटीरतावादी नेता मसरत आलमविरुद्ध आज शनिवारी अखेर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, त्याच्या अटकेच्या निषेधार्थ हुर्रियतने खोर्‍यात पुकारलेल्या बंदकाळात मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळून आला असून, पोलिसांनी केलेल्या गोळीबारात हुर्रियतचा एक कार्यकर्ता ठार, अन्य २४ जण जखमी झाले आहेत.
शुक्रवारी सकाळी पोलिसांनी मसरतला त्याच्या घरातच बेड्या ठोकल्या होत्या. आज त्याच्यावर कलम १२४ अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाने शुक्रवारी त्याची सात दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी केली होती.
दरम्यान, मसरतच्या अटकेचे तीव्र पडसाद खोर्‍याच्या विविध भागांमध्ये उमटले आहेत. हुर्रियतच्या नेत्यांनी बंद पुकारला असून, या काळात बडगाम जिल्ह्यात हुर्रियतच्या कार्यकर्त्यांनी पोलिस आणि जवानांवर तुफान दगडफेक केली. हिंसाचार वाढतच असल्याचे पाहून पोलिसांनी आधी लाठीमार करून पाहिला. पण, त्याचा काहीच प्रभाव न झाल्याने अखेर गोळीबार केला. यात एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला असून, संघर्षात २४ जण जखमी झाले आहेत.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22182

Posted by on Apr 18 2015. Filed under ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य (1767 of 2452 articles)


=काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनाला नकार, म्हणे, राज्यात हिंसाचार वाढेल= श्रीनगर, [१८ एप्रिल] - जम्मू-काश्मिरात दहशतवादाचा उद्रेक झाल्यानंतर स्थलांतरित झालेल्या काश्मिरी पंडितांच्या ...

×