Home » ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य » काश्मिरात विक्रमी ७० टक्के मतदान

काश्मिरात विक्रमी ७० टक्के मतदान

  • झारखंडमध्ये ६१.९२ टक्के
  • विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा

voting in jammu kashmirनवी दिल्ली, [२५ नोव्हेंबर] – दहशतवाद आणि नक्षलवादाचे सावट झुगारून जम्मू-काश्मीर आणि झारखंडमध्ये मंगळवार, २५ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत जबरदस्त मतदान झाले. झारखंडच्या १३ मतदारसंघात ६१.९२ टक्के आणि जम्मू-काश्मिरातील १५ मतदारसंघात विक्रमी ७० टक्के मतदान झाले. दोन्ही राज्यात मतदारांची टक्केवारी वाढण्याची शक्यता निवडणूक आयोगाने व्यक्त केली आहे.
जम्मू-काश्मीर आणि झारखंड या दोन्ही राज्यांमध्ये दहशतवादी आणि नक्षलवादी गटांनी बहिष्कार पुकारला होता. पण, धमकीला न जुमानता दोन्ही राज्यात मतदार मोठ्या संख्येत मतदान करण्यासाठी घराबाहेर पडले. झारखंडमध्ये पहिल्या टप्प्यात नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये मतदान सुरू असतानाही एकही अप्रिय घटना घडली नाही. सर्वत्र अतिशय शांततेत मतदान पार पडले. छतरा, गुमला, विष्णूपूर, लोहारडग्गा, मनिका, लातेहार, पानकी आणि डाल्टनगंज, विश्रामपूर, छतरपूर, हुसैनाबाद, गडवा आणि भावनाथपूर या मतदारसंघांमध्ये मतदान झाले.
जम्मू-काश्मीरच्या भदरवा, गंदेरबल, बंदिपुरा, बनिहाल, लेह, डोडा, किश्तवाड, कंगन, सोनवारी, नोबरा, कारगिल, झन्सकर, इंद्रवाल, रामबन आणि गुरेज या मतदारसंघांमध्ये उत्स्फूर्त मतदान झाले. दहशतवादाचे सावट असतानाही येथे ७० टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. कोणत्याही भागात मोठ्या हिंसाचाराची नोंद नाही.

Short URL: https://vrittabharati.in/?p=18582

Posted by on Nov 26 2014. Filed under ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य (2333 of 2452 articles)


=माहितीच्या अधिकारात मागविला तपशील= अहमदाबाद, [२५ नोव्हेंबर] - ‘देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या सुरक्षा रक्षकांकडून झाली होती. ...

×