Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » काश्मीरशिवाय चर्चा अशक्य!

काश्मीरशिवाय चर्चा अशक्य!

=पाकची मुजोरी कायम=
SartajAzizइस्लामाबाद, [२२ ऑगस्ट] – भारत आणि पाक यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमध्ये (एनएसए) चर्चा व्हावी, असे आम्हाला मनापासून वाटते. पण, भारत आपल्या जाचक अटी लादत आहे, अशा उलट्या बोंबा मारून, काश्मीरशिवाय भारतासोबत कोणतीही चर्चा होऊच शकत नाही, अशी मुजोरी पाकिस्तानने आज शनिवारी कायम ठेवली.
उद्या, रविवारी भारत आणि पाकमध्ये एनएसए पातळीवर चर्चा होऊ घातली असतानाच, पाकने या चर्चेआधी जम्मू-काश्मिरातील फुटीरतावाद्यांशी चर्चा करण्याचा अट्टाहास धरला आहे. भारताने मात्र द्विपक्षीय चर्चेत तिसर्‍या पक्षाला जागाच नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे या चर्चेवर अनिश्‍चिततेचे सावट पसरले असतानाच, पाकचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सरताज अझीज यांनी काश्मीरशिवाय भारतासोबत चर्चा शक्य नसल्याचे सांगितले.
भारत सरकारने काश्मिरींचे प्रतिनिधी असलेल्या हुर्रीयत नेत्यांना अटक केली आहे. यामुळे आम्ही नाराज आहोत. आमच्या दृष्टीने काश्मीरपेक्षा दुसरा कोणताही मुद्दा महत्त्वाचा नाही. भारताला काश्मीर महत्त्वाचे वाटत नसेल, तर या देशाने सीमेवर इतक्या मोठ्या प्रमाणात जवान का तैनात केले आहेत, असा सवाल करताना, रशियाच्या ऊफा येथील बैठकीत काश्मीरसह सर्वच मुद्यांवर तोडगा काढण्याचा निर्णय झाला असतानाही, भारत केवळ दहशतवादावरच भर देत आहे. त्यामुळे पाकसोबत चर्चा करायची की नाही, हे आता भारतानेच ठरवावे, असेही त्यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23667

Posted by on Aug 23 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1517 of 2458 articles)


=नितीन गडकरी यांचे मत= नवी दिल्ली, [२२ ऑगस्ट] - बिहारमधील आगामी विधानसभा निवडणूक ही केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या सव्वा वर्षाच्या ...

×