Home » ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य » काश्मीर बळकावण्याचे स्वप्न पाहणे थांबवा

काश्मीर बळकावण्याचे स्वप्न पाहणे थांबवा

=भाजपाचा पाकला इशारा=
Khalid-Jehangir-BJP-Spokesperson1श्रीनगर, [१६ ऑक्टोबर] – जम्मू-काश्मीर हे भारताचेच अविभाज्य अंग होते आणि राहील. तेव्हा, काश्मीर बळकावण्याचे स्वप्न पाहणे पाकिस्तानने थांबवावे. आमच्या देशातील कायदा व सुव्यवस्थेविषयी भाष्य करण्याऐवजी या देशाने पाकव्याप्त काश्मिरातील सुव्यवस्थेची घडी नीट बसविण्यावर भर द्यावा, असा इशारा प्रदेश भाजपाने आज शुक्रवारी दिला.
भारताचे तुकडे करणे, हाच पाकचा उद्देश राहिला आहे. पण, आता याच देशात बॉम्बस्फोट, अतिरेकी हिंसाचार, दंगली यासारख्या घटना नित्याच्याच आहेत. अलीकडील काळात पाकमधील हिंसाचारात हजारो लोकांचा बळी गेला आहे. पाकमध्ये दहशतवादी संघटना समांतर सरकार चालवित आहेत. या देशातील राजकारणी अतिरेक्यांच्या हातचे बाहुले बनले आहेत. त्यांच्याच इशार्‍यावर ते चालत असतात. लष्करही सरकारला आपल्या इशार्‍यावर नाचवत आहे, अशी टीका प्रदेश भाजपाचे प्रवक्ते खलिद जहांगीर यांनी एका निवेदनातून केली.
पाकच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातील प्रवक्ते काझी खलिलुल्ला यांनी अलीकडेच, काश्मिरात जे काही सुरू आहे, तो सरकारी प्रायोजित दहशतवादच असल्याचे म्हटले होते. त्याविषयी विचारले असता जहांगीर यांनी पाकला कडक शब्दात सुनावले. पाकव्याप्त काश्मिरात मुक्ती लढा सुरू झाला आहे. तेथील नागरिकांना कायमचे भारतात यायचे आहे. पण, तेथील राज्यकर्ते निष्पाप नागरिकांवर अत्याचार करीत आहेत, असा आरोपही जहांगीर यांनी केला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25168

Posted by on Oct 17 2015. Filed under ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ज.काश्मीर, ठळक बातम्या, राज्य (1323 of 2452 articles)


नवी दिल्ली, [१६ ऑक्टोबर] - फेसबूकचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग येत्या २८ ऑक्टोबरला भारतात येणार आहे. यावेळी ...

×