Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » काश्मीर म्हणजे पाकच्या गळ्याची नस

काश्मीर म्हणजे पाकच्या गळ्याची नस

=नवाज शरीफ यांचे तुणतुणे, म्हणे, स्वातंत्र्यांची पहाट उजाडणारच=
Pakistan Prime Minister Nawaz Sharifइस्लामाबाद, [६ फेब्रुवारी] – काश्मीरवरून झालेल्या सलग चार युद्धात दारुण पराभव झाला असताना आणि याच मुद्यावरून संयुक्त राष्ट्रसंघातही वारंवार तोंडघशी पडल्यानंतरही पाकिस्तानने पुन्हा एकदा काश्मीरवरील राग आळवला आहे. काश्मीर म्हणजे पाकच्या गळ्याची नस आहे आणि काश्मीर प्रश्‍नाला पाठिंबा देणे हेच आमचे कर्तव्य आहे. या राज्यात स्वातंत्र्याची पहाट उजाडण्याचा दिवस आता फार दूर नाही, असे तुणतुणे पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी वाजविले आहे. तिथेच, काश्मीर हे भारताचा अविभाज्य अंग असून, भविष्यातही काश्मीरला भारतापासून कुणीही हिरावू शकणार नाही, अशी स्पष्ट ग्वाही भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिली आहे.
गुरुवारी काश्मीर एकता दिनानिमित्त पाकव्याप्त काश्मीरच्या मुझफ्फराबाद येथे विधानसभेच्या संयुक्त अधिवेशनात शरीफ यांचे भाषण झाले. यावेळी त्यांनी भारतविरोधी सूर लावून काश्मीर राग आळवला होता. ते म्हणाले की, अगदी लहानपणापासूनच काश्मीरसोबत माझे भावनिक संबंध राहिले आहेत. तेथील जनतेच्या अधिकारांसाठी सातत्याने लढा देणे हेच माझे कर्तव्य आहे. काश्मीर पाकिस्तानचे आहे आणि ते मिळविण्याचा आमचा निर्धार आहे. यावर कुठलीही तडजोड होऊ शकत नाही. काश्मीर प्रश्‍न सोडविण्यासाठी तेथील जनतेला स्वयंनिर्णयाचा अधिकार द्यायला हवा. काश्मीर तोडग्यातच दक्षिण आशियातील शांततेची किल्ली आहे.
काश्मिरातील दडपशाही, अत्याचार आणि अस्थिरतेचे ढग लवकरच दूर होतील आणि तेथील जनतेला स्वातंत्र्याची पहाट उजाडलेली दिसेल. तो दिवस आता फार दूर नाही, असा आशावादही व्यक्त करून, काश्मीरला पाकिस्तानच प्रगतीपथावर नेऊ शकतो, असा अफलातून दावाही त्यांनी केला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20349

Posted by on Feb 7 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (2115 of 2458 articles)


=टु-जी स्पेक्ट्रम घोटाळा= नवी दिल्ली, [६ फेब्रुवारी] - टु-जी स्पेक्ट्रम घोटाळ्याशी संबंधित एअरसेल-मॅक्सिस व्यवहार प्रकरणी द्रमुक नेते दयानिधी मारन आणि ...

×