Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » काही माजी पंतप्रधानांनी राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड केली : पर्रिकर

काही माजी पंतप्रधानांनी राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड केली : पर्रिकर

parrikar_manohar3नवी दिल्ली, [२३ जानेवारी] – काही माजी पंतप्रधानांनी राष्ट्रीय सुरक्षेसोबत तडजोड केली होती, असा स्पष्ट आरोप संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी केला. कॉंगे्रसने मात्र यावर ताबडतोब आक्षेप घेतला असून, पर्रिकर यांनी पुरावे सादर करावे किंवा मग माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
एका कार्यक्रमात बोलताना पर्रिकर म्हणाले की, काही माजी पंतप्रधानांनी निश्‍चितपणे देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड केली आहे. अशा माजी पंतप्रधानांची नावे मी जाहीर करणार नाही. देशातील जनतेला त्यांची माहिती आहे. याचवेळी त्यांनी पाकिस्तानच्या कराची बंदरातून पोरबंदरपर्यंत आलेल्या संशयित नौकेची माहिती दिली असती तर त्या माहितीचा स्रोत उघड झाला असता, असेही स्पष्ट केले.
पर्रिकरांच्या या वक्तव्यावर कॉंग्रेस नेते मनीष तिवारी यांनी ट्विट करून प्रश्‍न उपस्थित केला. पर्रिकर यांनी अतिशय गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी पुरावे द्यावेत आणि त्या माजी पंतप्रधानांनीची नावे जाहीर करावी किंवा माफी मागावी, असे तिवारींनी म्हटले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20021

Posted by on Jan 24 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (2180 of 2453 articles)


=तीन ठार, १६ जखमी, दोन कैदी फरार= आरा, [२३ जानेवारी] - बिहारच्या आरा येथील दिवाणी न्यायालयाच्या संकुलात झालेल्या मानवी बॉम्ब ...

×