Home » कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय » किंगफिशर हाऊसला खरेदीदारच मिळेना

किंगफिशर हाऊसला खरेदीदारच मिळेना

Kingfisher-house-to-be-auctionedमुंबई, [१७ मार्च] – सध्या परदेशात असलेले मद्यसम्राट विजय मल्या यांच्याकडे असलेल्या थकित कर्जाची वसुली करण्यासाठी येथील किंगफिशर हाऊसच्या गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन लिलावात खरेदीदारच मिळाला नाही.
मुंबईच्या अंधेरी या पश्‍चिम उपनगरात हे किंगफिशर हाऊस आहे. किंगफिशर हाऊसच्या लिलावासाठी १५० कोटी रुपये ही आधारभूत किंमत ठरविण्यात आली होती. परंतु, सकाळी सुरू झालेली ऑनलाईन लिलाव प्रक्रिया सायंकाळपर्यंत एकाही खरेदीदाराने बोली न लावताच बंद झाली. भारतीय स्टेट बँकेने आपले थकित कर्ज वसूल करण्यासाठी हा ई-लिलाव आयोजित केला होता. विजय मल्यांकडील थकित कर्ज वसुलीसाठी प्रयत्नशील असलेल्या १७ बँकांच्या समूहात एसबीआयचाही समावेश आहे.
२०१२ पासून ठप्प पडलेल्या किंगफिशर एअरलाईन्सकडे असलेले ९ हजार कोटींचे थकित कर्ज वसूल करण्यासाठी बँकांनी कारवाई सुरू केल्याची कुणकूण लागताच विजय मल्या देश सोडून ब्रिटनमध्ये गेले.
मल्यांनी ईडीला मागितली मुदत
सध्या लंडन येथे असल्याची चर्चा सुरू असतानाच विजय मल्या यांनी अंमलबजावणी संचालनासमोर (ईडी) हजर राहण्यासाठी एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात यावी, अशी विनंती केली आहे. त्यामुळे आयडीबीआय बँकेतील कर्ज घोटाळ्याप्रकरणी बजावण्यात आलेल्या समन्सचे पालन करत ते हजर राहणार नाहीत, हे जवळपास स्पष्ट झाले आहे.
आपण बजावलेल्या समन्सच्या वेळी विजय मल्या यांचे वकील नव्हे तर त्यांना स्वत: हजर व्हावे लागेल, असे ईडीने स्पष्ट केल्यानंतर मल्या यांनी ही मुदत देण्याची विनंती केली आहे. विजय मल्या यांनी विनंती करताना दिलेले उत्तर आणि कारणांचा अभ्यास केल्यानंतर त्यांना एप्रिलपर्यंत मुदत द्यायची की नाही, याचा निर्णय घेण्यात येईल, असे ईडीच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. अवैध सावकारी प्रकरणात १८ मार्चला हजर राहा, असा समन्स ईडीने मल्या यांना बजावला आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27408

Posted by on Mar 18 2016. Filed under कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in कायदा-न्याय, ठळक बातम्या, राष्ट्रीय (628 of 2453 articles)


मुंबई, [१७ मार्च] - अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार २०१६-१७ या वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प उद्या शुक्रवारी विधानसभेत सादर करणार असून, या अर्थसंकल्पातून ...

×