Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » किरण बेदींवर काळाने २७ वर्षांनंतर उगवला सूड

किरण बेदींवर काळाने २७ वर्षांनंतर उगवला सूड

=वकिलाने केला विधानसभा निवडणुकीत पराभव=
Kiran-Bedi3नवी दिल्ली, [१२ फेब्रुवारी] – कृष्णानगर मतदारसंघात आपचे उमेदवार ऍड. एस. के. बग्गा यांनी किरण बेदी यांचा पराभव केला आणि दिल्लीतील वकिलांचा २७ वर्षापासून सुरू असलेला संघर्ष संपला. भाजपाने किरण बेदी यांना मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार जाहीर करताच दिल्लीतील वकिलांनी त्यांच्या नावाला प्रखर विरोध केला होता. लाठीहल्ल्याच्या त्या घटनेसाठी किरण बेदी यांनी माफी मागावी, अशी वकिलांच्या संघटनेची मागणी होती. आमचा विरोध भाजपाला नाही तर किरण बेदी यांना आहे, अशी वकील संघटनांची भूमिका होती. मात्र किरण बेदी यांनी माफी मागण्यास नकार दिला होता. विशेष म्हणजे प्रचारादरम्यान वकिलांनी बेदी यांच्या कार्यालयावर हल्ला केला होता. यात भाजपाचे काही कार्यकर्ते जखमीही झाले होते. दरम्यान, भाजपाने वकिलांची एक बैठक बोलावून हा तणाव दूर करण्याचा प्रयत्न केला. वकिलांवरील लाठीहल्ल्याची मूळ घटना १९८८ ची आहे. त्यावेळी किरण बेदी उत्तर दिल्लीच्या पोलिस उपायुक्त होत्या. दिल्लीच्या सेंट स्टिफन कॉलेजमधील लेडीज कॉमनरूममधील चोरीच्या एका घटनेप्रकरणी पोलिसांनी राजेश अग्निहोत्री नावाच्या वकिलाला ५ जानेवारी १९८८ ला अटक केली होती. दुसर्‍या दिवशी या वकिलाला पोलिसांनी न्यायालयात हातकड्या लावलेल्या स्थितीत उपस्थित केले. त्यामुळे दिल्लीतील वकील संघटनांचा भडका उडाला. आक्षेप अग्निहोत्री यांना अटक करण्याला नव्हता. मात्र, एका वकिलाला पोलिसांनी हातकड्या लावून न्यायालयात उपस्थित करण्यावर होता. वकील संघटनांनी या घटनेच्या निषेधार्थ संप पुकारला. पोलिसांनी माफी मागण्याची मागणी केली. मात्र, पोलिसांनी माफी मागण्यास नकार दिला. त्यामुळे पोलिस आणि वकील संघटना यांच्यात संघर्षाची स्थिती उद्‌भवली. दिल्लीतील वकील बेमुदत संपावर गेले. न्यायालयाने नंतर अग्निहोत्री यांची जामिनावर सुटका केली असताना किरण बेदी यांनी २१ जानेवारी १९८८ रोजी घेतलेल्या पत्रपरिषदेत अग्निहोत्री यांचा उल्लेख चोर असा केला. त्यामुळे वकिलांमधील असंतोषाचा स्फोट झाला. दुसर्‍या दिवशी जवळपास शंभरावर वकील किरण बेदी यांना भेटायला त्यांच्या तीस हजारी न्यायालय परिसरातील कार्यालयात गेले. किरण बेदी यांनी वकिलांना भेटण्यास नकार दिला. त्यामुळे वातावरण तापले. घोषणबाजी सुरू झाली. वकिलांनी किरण बेदी यांच्या कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी लाठीहल्ला केला. या लाठीहल्ल्यात ३० वकील जखमी झाले. किरण बेदी यांच्या आदेशाने पोलिसांनी लाठीहल्ला केल्याचा वकील संघटनांचा आरोप होता. वातावरण तापल्यानंतर लाठीहल्ल्याच्या या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले. न्या. वाधवा यांनी या घटनेची चौकशी करून किरण बेदी यांच्यावर लाठीहल्ल्यासाठी ठपका ठेवला. राजेश अग्निहोत्री यांना अटक करण्याची पोलिसांची कृती योग्य होती. मात्र, त्यांना हातकड्या घालणे चूक होते, असे न्या. वाधवा आयोगाने म्हटले. वकिलांच्या संघटनांचे कानही न्या. वाधवा आयोगाने पिळले.
फेब्रुवारी महिन्यात तीसहजारी न्यायालयाच्या परिसरात आलेल्या मोर्चाने कार आणि वकिलांच्या चेंबरवर हल्ला चढवला. किरण बेदी यांना पाठिंबा देण्यासाठी हा मोर्चा त्यांच्या संमतीने हा मोर्चा आणण्यात आला, असा ठपकाही न्या. वाधवा आयोगाने ठेवला. किरण बेदी यांना निलंबित करण्याची वकिलांची मागणी होती. मात्र, सरकारने बेदींना निलंबित न करता त्यांची बदली केली. त्यामुळे दिल्लीतील वकिलांचा किरण बेदी यांच्यावरील राग २७ वर्षानंतरही कायम होता. भाजपाने किरण बेदी यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करताच तो पुन्हा उफाळून आला. योगायोग म्हणजे कृष्णानगर मतदारसंघात किरण बेदी यांच्याविरुद्ध आपने बग्गा नावाच्या वकिलालाच उभे केले. या वकिलाने भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात किरण बेदी यांचा पराभव करुन २७ वर्षांपूर्वीच्या घटनेचा बदला घेतला आणि मुख्यमंत्रीच नव्हे तर आमदार होण्याचेही त्यांचे स्वप्न उद्‌ध्वस्त केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=20521

Posted by on Feb 13 2015. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (2068 of 2452 articles)


=मनीष सिसोदिया उपमुख्यमंत्री होणार= नवी दिल्ली, [१२ फेब्रुवारी] - आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल दिल्लीचे नवे मुख्यमंत्री म्हणून शनिवार ...

×