किमान तापमान : 27.88° C
कमाल तापमान : 29.29° C
तापमान विवरण : scattered clouds
आद्रता : 87 %
वायू वेग : 2.12 Mps
स्थळ : Mumbai, IN
29.29° C
28.53°C - 30.65°C
few clouds28.31°C - 30.68°C
overcast clouds27.86°C - 29.89°C
few clouds27°C - 28.73°C
sky is clear26.4°C - 28.68°C
light rain27.15°C - 28.53°C
scattered cloudsनवी दिल्ली, [२० जानेवारी] – भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी उद्या बुधवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीकरिता पूर्व दिल्लीतील कृष्णा नगर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
अर्ज सादर करण्यापूर्वी किरण बेदी भव्य रोड शो आयोजित करणार आहेत. उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा अंतिम दिवस आहे. सकाळी बेदी यांचा रोड शो होईल. त्यानंतर त्या निवडणूक अधिकार्यांच्या कार्यालयात जाऊन आपला अर्ज भरतील, अशी माहिती सूत्राने दिली.
दरम्यान, आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आज मंगळवारी रोड शो केल्यानंतर त्यांना अर्ज सादर करता आला नाही. आपल्या निवासस्थानाहून ते अर्ज सादर करण्यासाठी मोठ्या संख्येत समर्थकांसह निघाले होते. पण, अर्ज न भरताच ते परतले. अभूतपूर्व गर्दीमुळे आपण अर्ज भरू शकलो नाही, असे कारण त्यांनी दिले. आता तेदेखील उद्या बुधवारीच अर्ज सादर करणार आहेत. त्यांच्याशिवाय कॉंगे्रस नेते अजय माकनही अर्ज सादर करणार आहेत.