Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » किरण बेदी पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल

किरण बेदी पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल

Kiran_Bedi_BJPनवी दिल्ली, [२२ मे] – माजी पोलिस अधिकारी आणि भाजपा नेत्या किरण बेदी यांना केंद्र सरकारने आज रविवारी पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल म्हणून नियुक्त केले.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शिफारसीवर तातडीने कारवाई करताना राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी किरण बेदी यांच्या नियुक्तीवर मोहर उमटवली. किरण बेदी आपला कार्यभार स्वीकारतील, त्या दिवसापासून त्यांची नियुक्ती ग्राह्य मानली जाणार आहे. गेल्या दोन वर्षांपासून पुद्दुचेरीच्या नायब राज्यपालपदाची अतिरिक्त जबाबदारी अंदमान-निकोबारच्या नायब राज्यपालांकडे होती.
आपल्या नियुक्तीवर आनंद व्यक्त करताना किरण बेदी म्हणाल्या की, ही नवीन जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडणार आहे. नागरिकांचे हित माझ्यासाठी सर्वतोपरी असेल. माझा प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण जनतेसाठीच राहील. केंद्र सरकारने माझ्यावर ठेवलेल्या विश्‍वासासाठी मी आभारी आहे. अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंगे्रस-द्रमुक युती १७ जागा जिंकून सत्तेवर आली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28424

Posted by on May 22 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (291 of 2453 articles)


आसामात भाजपापर्व प्रारंभ होणार विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड गुवाहाटी, [२२ मे] - भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार सर्बानंद सोनोवाल यांची आज ...

×