Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » किरण बेदी मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार

किरण बेदी मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार

=अमित शाह यांनी केली घोषणा=
Kiran_Bedi_BJPनवी दिल्ली, [१९ जानेवारी] – दिल्ली विधानसभेची निवडणूक भारतातील पहिल्या महिल्या आयपीएस अधिकारी किरण बेदी यांच्या नेतृत्वात लढविण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीने सोमवारी रात्री घेतला.
भाजपा संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी एका पत्रपरिषदेत ही घोषणा केली. किरण बेदी याच भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. बेदी यांच्या नेतृत्वात भाजपाला विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळेल, असा विश्‍वासही शाह यांनी यावेळी व्यक्त केला. किरण बेदी या कृष्णानगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढतील, असे स्पष्ट करीत शाह म्हणाले की, किरण बेदींच्या नावावर पक्षात कोणतेही मतभेद नव्हते, त्यांच्या संदर्भातील निर्णय एकमताने घेण्यात आला.
केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत दिल्लीतील ७० जागांचे उमेदवारही निश्‍चित करण्यात आले, असे स्पष्ट करीत शाह म्हणाले की, ही निवडणूक भाजपा आपला मित्रपक्ष असलेल्या अकाली दलाला सोबत घेऊन लढणार आहे. किरण बेदी यांनी भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी यांच्या विरोधात संघर्ष केला आहे. पोलिस खघत्यातील निवृत्तीनंतर सामाजिक क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्या दिल्लीतील जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करतील, असा विश्‍वासही शाह यांनी व्यक्त केला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19824

Posted by on Jan 20 2015. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (2207 of 2452 articles)


नवी दिल्ली, [१९ जानेवारी] - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर राजधानी दिल्लीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली ...

×