कुणालाही घाबरत नाही : छोटा राजन
Thursday, October 29th, 2015नवी दिल्ली, [२८ ऑक्टोबर] – दाऊद इब्राहिमला घाबरून आपण बाली पोलिसांना शरण गेलो, या वृत्ताचे सध्या इंडोनेशियन पोलिसांच्या ताब्यात असलेल्या छोटा राजनने खंडन केले आहे. मला कुणाचीही भीती नाही आणि दाऊदला तर मी मुळीच घाबरत नाही, असे राजन म्हणाला. दरम्यान, राजनच्या जिवाला असलेला धोका लक्षात घेता, बाली पोलिसांनी त्याला कमांडोजची सुरक्षा उपलब्ध केली आहे.
झिम्बाब्वेत जाऊ द्या
भारतात फाशीचा फंदा आणि दाऊदच्या डी कंपनीचे गुंड आपली प्रतीक्षा करीत असल्याची परिपूर्ण माहिती असलेला छोटा राजन अक्षरश: भयभीत झाला आहे. मला भारतात पाठवू नका, झिम्बाब्वेला जाऊ द्या, अशी विनवणी तो इंडोनेशिया पोलिसांना करीत आहे.
इंडोनेशियाच्या बाली शहरातील वरिष्ठ पोलिस अधिकार्याने एका वृत्तवाहिनीशी बोलताना याबाबत माहिती दिली. मला भारतीय पोलिसांच्या स्वाधीन करू नका, यासाठी तो वारंवार आम्हाला विनंती करीत असल्याचे या अधिकार्याने सांगितले.
भारत आणि इंडोनेशिया यांच्यात प्रत्यार्पण करार असल्याने, भारतीय पोलिसांचे वरिष्ठ पथक आपल्याला ताब्यात घेण्यासाठी रवाना होण्याच्या तयारीत असल्याचे त्याला समजले आहे. त्यामुळे सुटकेसाठी त्याची सातत्याने तळमळ सुरू आहे. बाली येथील रिसोर्टमध्ये तीन-चार दिवस मुक्काम केल्यानंतर मी झिम्बाब्वेला जाणार होतो. तिथे मला अनेक महत्त्वाची कामे निकाली काढायची होती. कृपया मला अडवू नका, जाऊ द्या, असेही तो वारंवार सांगत असल्याचे अधिकारी म्हणाला.
Short URL: https://vrittabharati.in/?p=25374

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!