Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » कुत्रा म्हणा, पण पाकिस्तानी नको!

कुत्रा म्हणा, पण पाकिस्तानी नको!

=बलुच सोडून भारतात आलेल्या मजदकचा संताप=
Mazdak Dilshad Balochनवी दिल्ली, [२० ऑगस्ट] – बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैनिकांच्या अत्याचारामुळे देश सोडून भारतात आलेल्या मजदक दिलशान बलूच या तरुणाने पाकी अत्याचाराचा पर्दाफाश केला. तुम्ही मला एकवेळ कुत्रा म्हणा, पण पाकिस्तानी नागरिक म्हणून माझा अपमान करू नका, असा संताप या तरुणाने व्यक्त केला आहे.
पाकी सैनिकांच्या अमानुष अत्याचारांमुळे बलुचिस्तान व गिलगिट प्रांतातील हजारो नागरिकांवर देश सोडून जाण्याची वेळ आली आहे. त्यात या तरुणाचाही समावेश आहे. हा तरुण दिल्ली विमानतळावर आल्यानंतर कॅनडाच्या पासपोर्टवर जन्मस्थळाच्या ठिकाणी पाकच्या क्वेट्टा शहराचे नाव दिसल्यानंतर इमिग्रेशन अधिकार्‍यांनी त्याची चौकशी केली असता, मजदकने आपली कैफियत मांडली. यानंतर एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना त्याने पाकच्या सैनिकांकडून सुरू असलेल्या अत्याचाराचा पाढाच वाचला.
पाकमुळे माझे एकट्याचेच नव्हे, तर बलूच आणि गिलगिट प्रांतातील हजारो नागरिकांचे आयुष्य उद्‌ध्वस्त झाले आहे. हजारो लोकांना आपले घरदार सोडावे लागले असून, ते अन्य देशांमध्ये निर्वासित म्हणून जीवन जगत आहेत. पाकी सैनिकांनी माझ्या वडिलांचे अपहरण केले, माझ्या आईवर अतोनात अत्याचार केले आणि आमच्या संपत्तीचाही ताबा घेतला. या अत्याचाराला कंटाळून आम्ही २००८ मध्ये कॅनडात आश्रय घेतला, असे तो म्हणाला.
मी आणि पत्नी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढा देत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात बलूच, गिलगिट आणि पाकव्याप्त काश्मीरचा उल्लेख करून आमच्या या लढ्याला पाठबळ दिले. ७० वर्षांनंतर प्रथमच भारत आमच्या बाजूने उभा राहिला आहे. बलुचच्या स्वातंत्र्यासाठी भारताचे सहकार्य अतिशय आवश्यक आहे, असेही त्याने सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29229

Posted by on Aug 21 2016. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (113 of 2458 articles)


भोपाळ, [१९ ऑगस्ट] - मध्यप्रदेश भाजपाचे संकेतस्थळ पाकिस्तानी हॅकर्सने हॅक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. भाजपा संकेतस्थळाच्या मुख्यपृष्ठावर मुसलमानांना मारणे ...

×