Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » केंद्राकडून मनरेगासाठी १२,२३० कोटी वितरित

केंद्राकडून मनरेगासाठी १२,२३० कोटी वितरित

MgNaregaनवी दिल्ली, [९ एप्रिल] – महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अर्थात मनरेगा या योजनेंतर्गत राज्यांना निधी वितरित करण्यात होत असलेल्या विलंबाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने जाब विचारल्यानंतर केंद्र सरकारने आज शनिवारी सर्व राज्यांसाठी या योजनेंतर्गत १२,२३० कोटी रुपयांचा निधी वितरित केला.
ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे या योजनेसाठी एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात निधी वितरित करण्याची कदाचित ही पहिलीच वेळ आहे. या संदर्भात माहिती देताना ग्रामीण विकास मंत्री वीरेंद्र सिंह म्हणाले की, मनरेगाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यांना केंद्रीय वाटा म्हणून हा निधी तातडीने वितरित करण्यात आला आहे.
२०१५-१६ या आर्थिक वर्षाच्या काळात मनरेगांतर्गत काम करणार्‍या अनेकांना वेतन देण्यात आले नव्हते. त्यांचे वेतन देण्यासोबतच चालू आर्थिक वर्षाच्या काळात मनरेगावर काम करणार्‍यांना वेतन देणे यामुळे राज्यांना शक्य होणार आहे. या योजनेचा उद्देश साध्य करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. यासाठी निधीची कमतरता कधीच भासणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मनरेगाअंतर्गत राज्यांना निधी वितरित न केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने गेल्या बुधवारी केंद्र सरकारला जाब विचारला होता. सोबतच, दुष्काळाचा सामना करीत असलेल्या देशातील नऊ राज्यांकरिता केंद्राने किती खर्च केला, याचा तपशीलही मागितला होता. मदतीचा हात तातडीने द्या, त्यासाठी विलंब व्हायला नको, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27784

Posted by on Apr 10 2016. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (499 of 2453 articles)


=आम आदमी सेनेच्या कार्यकर्त्याला अटक= नवी दिल्ली, [९ एप्रिल] - दुसर्‍या टप्प्यातील सम-विषम अभियानाची घोषणा करण्यासाठी दिल्ली सचिवालयात आयोजित पत्रपरिषदेत ...

×