Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » केंद्राने परराष्ट्र संबंधांचा विचार करायलाच हवा

केंद्राने परराष्ट्र संबंधांचा विचार करायलाच हवा

=नेताजींच्या फाईल्सबाबत नायडू यांचे मत=
Venkaiah-Naidu2हैदराबाद, [१९ सप्टेंबर] – पश्‍चिम बंगाल सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित गोपनीय फाईल्स सार्वजनिक केल्या असल्या, तरी केंद्र सरकारने मात्र भारताच्या अन्य देशांसोबतच्या संबंधांवर यामुळे होणार्‍या परिणामांचा सखोल अभ्यास करूनच सावधानता बाळगून पाऊल उचलायला हवे, असे मत केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांनी आज शनिवारी येथे व्यक्त केले.
पश्‍चिम बंगाल सरकारने नेतांजींशी संबंधित काही फाईल्स सार्वजनिक केल्या, ही फार चांगली बाब आहे. पण, केंद्राने अशा प्रकारचा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपल्या परराष्ट्र संबंधांचा गांभीर्याने विचार करायलाच हवा. आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि शेजारील देशांच्या संबंधांवर त्याचे होणारे परिणाम विचारात घेणे अतिशय आवश्यक आहे, असे नायडू यांनी एका कार्यक्रमाच्या अनुषंगाने पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबाबत नेमके काय झाले होते, हे जाणून घेण्याचा अधिकार या देशातील प्रत्येकाला आहे, असे मलाही प्रामाणिकपणे वाटते. पण, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी केंद्राने सर्व परिणामांचा विचार करावा. मला खात्री आहे की, सरकार योग्य तो विचार करीत असेल, असे त्यांनी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23911

Posted by on Sep 20 2015. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (1443 of 2453 articles)


यवतमाळमधील धरणांत ९६ टक्के जलसाठा विदर्भातील धरणांत ७५ टक्के जलसंचय अमरावती/नागपूर, [१९ सप्टेंबर] - विदर्भातील धरणांमध्ये भरपूर पाणी साठले ...

×