Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » केंद्राने वाढविली बोनसची मर्यादा

केंद्राने वाढविली बोनसची मर्यादा

=औद्योगिक कामगारांसाठी खुशखबर=
bonusनवी दिल्ली, [२१ ऑक्टोबर] – दिवाळी तोंडावर असतानाच, केंद्रीय मंत्रिमंडळाने आज बुधवारी औद्योगिक कामगारांना आनंदाची बातमी दिली आहे. या कामगारांच्या बोनससाठी असलेली मासिक मर्यादा ३५०० वरून ७ हजार रुपयांपर्यंत वाढविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. याबाबतचे दुरुस्ती विधेयक संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सादर केले जाणार आहे.
बोनस कायदा १९६५ अंतर्गत आतापर्यंत मासिक दहा हजार रुपये वेतन मिळविणार्‍या कामगारांना केवळ ३५०० रुपये बोनस देण्याची तरतूद होती. पण, या नव्या प्रस्तावामुळे कमाल वेतनाची मर्यादा २१ हजार रुपयांपर्यंत वाढविण्यात आली असून, मिळणार्‍या बोनसमध्ये सात हजारांपर्यंत वाढ करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला, अशी माहिती या घडामोडीशी संबंधित सूत्राने दिली.
ज्या ठिकाणी २० पेक्षा जास्त कामगार काम करीत आहेत, त्या सर्वच कारखान्यांत आणि कंपन्यांमध्ये हा नवा प्रस्ताव लागू होणार आहे. बोनसची मर्यादा वाढविण्यासाठी पेमेंट ऑफ बोनस ऍक्टमध्ये आवश्यक त्या दुरुस्त्या लवकरच करण्यात येणार असल्याचे सूत्राने सांगितले.
गेल्या महिन्याच्या सुरुवातीला केंद्रीय श्रमिक संघटनांनी बोनसची पात्रता मर्यादा वाढविण्यासाठी आंदोलन केले होते. तेव्हा श्रममंत्री बंडारू दत्तात्रय यांनी सरकार या मागणीवर सकारात्मक विचार करीत असल्याचे आश्‍वासन या संघटनांना दिले होते, हे विशेष!

Short URL: https://vrittabharati.in/?p=25240

Posted by on Oct 22 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1307 of 2453 articles)


=पतधोरण ठरविण्यासाठी समितीचा केंद्राचा प्रस्ताव= नवी दिल्ली, [२१ ऑक्टोबर] - देशाचे पतधोरण केवळ भारतीय रिझर्व्ह बँकेनेच ठरवू नये, त्यासाठी उच्चस्तरीय ...

×