Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता ६ टक्क्यांनी वाढणार

केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता ६ टक्क्यांनी वाढणार

=पुढील महिन्यात निर्णयाची शक्यता=
gov serventनवी दिल्ली, [१२ जून] – केंद्रीय कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता अर्थात डीए पुढील महिन्यात आणखी सहा टक्क्यांनी वाढविण्यात येणार आहे. हा वाढीव महागाई भत्ता त्यांना एप्रिलच्या वेतनापासून मिळू शकतो.
केंद्रीय कर्मचार्‍यांना सध्या ११३ टक्के इतका महागाई भत्ता मिळतो. त्यात आणखी सहा टक्के वाढ करण्याच्या प्रस्तावावर केंद्र सरकार विचार करीत आहे. जुलै महिन्यात याबाबतचा निर्णय अपेक्षित आहे, अशी माहिती या घडामोडीशी संबंधित सूत्राने दिली.
जानेवारी ते एप्रिल या काळातील महागाईच्या दरात झालेल्या चढ-उतारानुसार महागाई भत्ता ठरविला जाणार आहे. तथापि, नेमकी किती वाढ करावी, हा निर्णय मे आणि जूनमधील महागाई निर्देशांक जारी झाल्यानंतरच होईल. यापूर्वी जानेवारी महिन्यात महागाई भत्ता सहा टक्क्यांनी वाढविण्यात आला होता. आताही याच प्रमाणात त्यात वाढ होण्याची शक्यता असल्याचे सूत्राने सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22845

Posted by on Jun 13 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1627 of 2453 articles)


नवी दिल्ली, [११ जून] - बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्या देशाने माजी पंतप्रधान व ज्येष्ठ भाजपा नेते अटलबिहारी वाजपेयी ...

×