Home » ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय » केंद्रीय मंत्री करणार ६८ देशांचा दौरा

केंद्रीय मंत्री करणार ६८ देशांचा दौरा

=राजनयिक संबंध असलेल्या सर्व राष्ट्रांशी संपर्क=
world-mapनवी दिल्ली, [१० सप्टेंबर] – भाजपाप्रणीत रालोआ सरकारमधील मंत्र्यांनी भारतासोबत राजनयिक संबंध असलेल्या सर्व १९२ देशांना भेट द्यावी आणि संबंध मजबूत करावे, या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्देशाची पूर्तता करण्यासाठी केंद्रीय मंत्री आगामी तीन महिन्यांत ६८ देशांचा दौरा करणार आहेत.
याच अनुषंगाने केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह लवकरच हंगेरीला भेट देणार आहेत. मोदी सरकारमधील कोणत्याही मंत्र्याने अद्याप या देशाचा दौरा केला नाही. त्याचप्रमाणे विधिमंत्री रविशंकर प्रसाद इस्टोनिया व लॅटव्हियाला, तर खतमंत्री अनंतकुमार टोंगोला जाणार आहेत. अन्नमंत्री रामविलास पासवान मॉरिशसचा दौरा करतील.
सर्व ६८ देशांचा दौरा करण्याची ही प्रक्रिया याच वर्षीच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. भारतीय मंत्र्याने भेट दिली नाही, असा एकही देश या वर्षाच्या अखेरीस राहायला नको, हे सरकारचे धोरण असून, माझ्या मंत्रालयाने अद्याप मंत्र्याने भेट न दिलेल्या ६८ देशांची ओळख निश्‍चित केली आहे. तसे पत्रही मी सर्व मंत्र्यांना पाठविले आहे, अशी माहिती परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली. राजनयिक संबंध असलेल्या सर्व १९२ देशांसोबत भारताचे द्विपक्षीय संबंध जास्तीत जास्त मजबूत करणे, हाच यामागील एकमेव उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=29279

Posted by on Sep 11 2016. Filed under ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, परराष्ट्र, राष्ट्रीय (97 of 2453 articles)


=भाजपाचा जबरदस्त हल्ला= नवी दिल्ली, [१० सप्टेंबर] - झाकिर नाईकची संस्था बेकायदेशीर कारवाया करत असल्याचे २०१२ मध्येच स्पष्ट झाले असतानाही, ...

×