Home » ठळक बातम्या, मराठवाडा » केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण आंध्रतून लातूरला पाणी देणार

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण आंध्रतून लातूरला पाणी देणार

  • १५ दिवसांत लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा
  • •स्वतःचे पाप लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न : खडसे

nirmala aitharaman, eknath khadseमुंबई, [७ एप्रिल] – चार-चार मुख्यमंत्री मराठवाड्याचे झालेत. दिवंगत विलासराव देशमुख हे तब्बल आठ वर्षे मुख्यमंत्री आणि २५ वर्षे मंत्री राहिलेत. तरीदेखील मराठवाडा आणि लातुरच्या पाण्याचा प्रश्‍न आजही कायम असले तर, ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. इतक्यावर्षात नियोजन न करता, आता आमच्या हेतूवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करणे म्हणजे, आपण केलेले पाप लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याचा जोरदार हल्लाबोल महसूल, मदत व पुनर्वसन मंत्री एकनाथ खडसे यांनी विरोधकांवर केला.
लातूर जिल्ह्यातील दुष्काळ आणि पाणीटंचाईमुळे गावकरी स्थलांतरित होत असल्याबाबतचा अमित देशमुखांच्या प्रश्‍नावर उत्तर देताना खडसे बोलत होते.
विलासराव देशमुखांचे नाव घेतल्याने, विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी, खडसे हे आपली जबाबदारी झटकून हेतूपुरस्सर आरोप करीत असल्याचा आक्षेप घेतला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खडसे राजकीय भाषण करत असल्याचे म्हणाले. तर, जयंत पाटील यांनीही खडसेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, खडसे यांनी, विरोधकांचा प्रयत्न निष्फळ ठरविला.
खडसे म्हणाले की, रेल्वे मंत्रालयाने दोन रेल्वे रॅक देण्यास मान्यता दिली आहे. मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन येत्या १५ दिवसांत लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करण्यात येईल. जवळपास २५ लाख लिटर पाणी देण्याचा सरकारचा मानस आहे. इच्छाशक्ती नसती तर, ७० वर्षात तुम्ही जे करू शकले नाही, तो रेल्वेने पाणी पुरविण्याचा इतिहासातला पहिला प्रयत्न केला नसता. संपूर्ण महाराष्ट्राचा पाणी प्रश्‍न सोडविण्यासाठी शासन युध्दपातळीवर प्रयत्न करीत आहे. मात्र, इतकी वर्षे राज्य करून, शेवटी पाण्यासारखा गंभीर प्रश्‍न हा आज मला सोडविण्याची वेळ येते असेल तर, हे राज्याचे दुर्दैव आहे.
जिल्हाधिकार्‍यांकडून घेतलेल्या माहितीनुसार लातूर जिल्ह्यातून कोणतेही स्थलांतर झालेले नाही. ऊसतोडणी कामगार जिल्ह्यातून रोजगारासाठी बाहेर गेले होते पण ते आता परत आले आहेत. लातूर जिल्ह्यात पाण्याचा प्रश्‍न गंभीर झाला असून, आपण स्वत: या जिल्ह्याच्याा केलेल्या दौर्‍यावेळी हे दिसून आल्याचे सांगून खडसे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी याबाबत सर्व सहकार्य केले आहे. आज केंद्रीय राज्यमंत्री निर्मला सीतारमन यांनीही आवश्यकता असल्यास आंध्रप्रदेशातून पाणी देण्याची तयारी दर्शविली असल्याने राज्य शासन कोणत्याही स्थितीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न मार्गी लावण्यास प्राधान्य देत आहे.
जनावरांसाठीही शासन गंभीर असून, आवश्यकता भासल्यास जास्तीच्या चारा छावण्या सुरू करण्याचे अधिकार जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आल्याचेही खडसे यांनी यावेळी सांगितले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27750

Posted by on Apr 8 2016. Filed under ठळक बातम्या, मराठवाडा. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, मराठवाडा (511 of 2454 articles)


=सर्वेक्षणातील सत्य= नवी दिल्ली, [७ एप्रिल] - देशातील मोदी लाट अजूनही ओसरली नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच देशातील लोकांमध्ये सर्वाधिक ...

×