Home » ठळक बातम्या, महाराष्ट्र » केंद्रीय स्वयंपाकगृहप्रणाली लवकरच सुरू: तावडे

केंद्रीय स्वयंपाकगृहप्रणाली लवकरच सुरू: तावडे

Vinod_Tawdeमुंबई, [२२ मार्च] – शालेय पोषण आहार योजनेंतर्गत नागरी भागात केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना आहाराचा पुरवठा करण्याबाबतचा निर्णय शासनाने घेतला होता. मात्र, याबाबत काही न्यायालयीन बाबी उद्‌भवल्यामुळे केंद्रीय स्वयंपाक प्रणाली अद्याप सुरू करता आलेली नाही. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय हा शासनाच्या बाजूने दिला आहे. यामुळे याबाबतच्या पुढील प्रक्रियेला लवकरच सुरुवात होईल, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली.
पुणे शहरात शालेय पोषण आहारासाठी केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणालीबाबत परिषद सदस्य दिप्ती चौधरी यांनी तारांकित प्रश्‍न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना तावडे बोलत होते.
महिला बालकल्याण, आदिवसी विकास आणि शालेय शिक्षण या तिन्ही विभागाच्या एकत्रितपणे काम करून शालेय विद्यार्थ्यांना चांगले माधान्ह भोजन देण्यासाठी शासन विचार करीत आहे. या योजनेचा एकत्रित खर्च सुमारे ६ हजार कोटी इतका अपेक्षित आहे. त्यामुळे सर्व विभागांनी मिळून ही योजना एकत्रित पद्धतीने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी राबविल्यास त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो. विद्यार्थ्यांना चांगल्या प्रतीचे भोजन मिळण्याच्या दृष्टीने इस्कॉन, अक्षय पात्र आदी संस्थांच्या माध्यमातून ही योजना एकत्रितपणे राबविण्याचा विचार सुरू आहे. इस्कॉनसारख्या संस्था स्वखर्चाने चांगल्या दर्जाचे माध्यान्य भोजन देतात. महिला बचत गटांसह अशा संस्थांनी कामे केली तर महिला बचत गटांना रोजगार मिळण्यास मदत होईल आणि चांगल्या दर्जाचे भोजन विद्यार्थ्यांना देता येईल, असे तावडे म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27548

Posted by on Mar 23 2016. Filed under ठळक बातम्या, महाराष्ट्र. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, महाराष्ट्र (581 of 2451 articles)


=नदी शुद्धीकरणाचा सविस्तर प्रकल्प अहवाल जारी= नवी दिल्ली, [२२ मार्च] - गंगा नदीच्या किनार्‍यावर वृक्षारोपण करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम कालबद्धरीत्या पूर्ण ...

×