Home » ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय » केंद्र सरकार आता प्रत्येकांना देणार पॅनकार्ड

केंद्र सरकार आता प्रत्येकांना देणार पॅनकार्ड

PAN - Permanent Account Numberनवी दिल्ली, [११ मे] – सर्वसामान्य नागरिकांसाठी तीन महत्त्वाकांक्षी योजनांचे लोकार्पण केल्यानंतर आणि जनधन योजना अभूतपूर्व यशस्वी केल्यानंतर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने आता देशातील प्रत्येकच नागरिकाला ‘पर्मनन्ट अकाऊंन्ट नंबर’ अर्थातच पॅनकार्ड देण्यासाठी मोहीम हाती घेण्याचे ठरविले आहे.
एक लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची खरेदी किंवा विक्री करण्यासाठी पॅनकार्ड देणे बंधनकारक केले जाणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपल्या पहिल्याच अर्थसंकल्पात केली होती. पण, केंद्र सरकारच्या या निर्णयावर अनेक आक्षेप घेण्यात आले होते. देशातील, विशेषत: ग्रामीण भागातील बहुसंख्य नागरिकांकडे पॅनकार्ड नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या नियमाची पूर्णपणे अंमलबजावणी होणे कठीण असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले होते.
प्रत्येक नागरिकाला पॅनकार्ड देण्याची योजना लवकरच देशभरात राबविण्यात येणार आहे, अशी माहिती देताना केंद्रीय अर्थमंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, जन धन योजनेप्रमाणे सर्वांना पॅन कार्ड देण्यासाठी सरकारतर्फे आता ऑनलाईन सुविधा सुरू केली जाणार आहे. या सुविधेमुळे अर्जदार ४८ तासांच्या आत पॅनकार्ड प्राप्त करू शकणार आहे. याशिवाय, केंद्र सरकार पॅनकार्ड देण्यासाठी देशभरात विशेष शिबिरे आयोजित करणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिक पॅनकार्डपासून वंचित राहणार नाही, याची परिपूर्ण काळजी या माध्यमातून घेण्यात येणार आहे.
देशभरातील २५ कोटी कुटुंबांपैकी आतापर्यंत सुमारे २१ कोटी व्यक्तींना पॅनकार्ड देण्यात आले आहे. त्यात कार्पोरेट क्षेत्रात काम करणार्‍या ७.५ लाख व्यक्तींचा समावेश आहे. आम्ही पॅनकार्ड मिळवण्यासाठीची प्रक्रिया सोपी करणार आहोत. प्रधानमंत्री जन धन योजनेमध्ये आम्ही प्रत्येकाला सामावून घेऊ शकलो, तर सर्वांना पॅनकार्ड देखील उपलब्ध करून देऊ शकतो. असे केंद्रीय अर्थराज्यमंत्री जयंत सिन्हा म्हणाले.
१० आकडी संख्या असणारे पॅन लॅमिनेटेड कार्डच्या स्वरूपात आयकर विभागाकडून देण्यात येते. पॅनकार्ड मिळविण्यासाठी छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र, आधार कार्ड आणि जन्म तारीख असलेले वैध पुरावे देणे आवश्यक आहे. एका विशिष्ट रकमेच्या (एक लाख रुपये) पलीकडे कोणतीही स्थावर मालमत्ता खरेदी वा विक्री करण्यासाठी, उत्पन्नावरील कर भरण्यासाठी किंवा मोटार, वाहनांच्या खरेदी-विक्रीसाठी पॅन कार्ड आवश्यक आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22492

Posted by on May 12 2015. Filed under ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, नागरी, राष्ट्रीय (1710 of 2453 articles)


=नरेंद्र मोदी यांचा राज्यांना मंत्र= कोलकाता, [१० मे] - भारत-बांगलादेश भू-सीमा करारासारख्या समस्यांसह अन्य संकटांवर केवळ ‘टीम इंडिया’च मात करू ...

×