केजरीवालांची उमेदवारी रद्द का करू नये
Tuesday, February 3rd, 2015=हायकोर्टाची नोटीस=
नवी दिल्ली, [२ फेब्रुवारी] – स्वत:ला नवी दिल्लीचे रहिवासी असल्याचे बेकायदेशीरपणे जाहीर केल्याप्रकरणी आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांची विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी रद्द करण्यात यावी, अशी विनंती करणार्या कॉंगे्रसच्या किरण वालिया यांच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने आज सोमवारी केजरीवाल यांना नोटीस जारी केली आहे.
नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार असलेले केजरीवाल यांनी मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करण्यासाठी आपण दिल्लीचे नागरिक असल्याचे नमूद केले आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन न्या. विभू बाखरू यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने, ‘तुमची उमेदवारी रद्द का केली जाऊ नये,’ अशी विचारणा केजरीवालांना केली आहे. सोबतच, निवडणूक आयोग आणि दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकार्यांनाही नोटीस जारी करून न्यायालयाने येत्या बुधवारपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले.
या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या बुधवारी होणार असल्याने त्यापूर्वी नोटीसला उत्तर देणे अनिवार्य आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले. केजरीवाल हे उत्तरप्रदेशच्या गाझियाबाद जिल्ह्यातील कौशांबी भागात असलेल्या गिरनार अपार्टमेंट, फ्लॅट क्रमांक चारमध्ये वास्तव्यास असतानाही, त्यांनी नवी दिल्ली मतदारसंघातील रहिवासी असल्याचे दाखविले. हा प्रकार फौजदारी गुन्ह्यात येत असल्याने त्यांची उमेदवारी रद्द करायलाच हवी, असे वालिया यांनी याचिकेत म्हटले आहे.
Short URL: https://vrittabharati.in/?p=20264

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!