Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » केजरीवालांचे आता डेंग्यूवरही राजकारण

केजरीवालांचे आता डेंग्यूवरही राजकारण

  • महापालिकेवर पैसे खाण्याचा आरोप
  • जंग यांच्या निर्देशांवर पंतप्रधानांना लिहिले पत्र

DENGU MOSQUETOनवी दिल्ली, [१८ सप्टेंबर] – राजधानी दिल्लीला डेंग्यू या अतिशय घातक आजाराने आपल्या विळख्यात घेतले असताना, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मात्र यावरही राजकारण करण्याचा मोह आवरला नाही. डेंग्यूला आळा घालण्यासाठी दिल्ली महापालिकेने सरकारकडे पैशाची मागणी केली असता, औषधांच्या खरेदीसाठी दिलेला पैसा कुठे घातला, इतका पैसा जातो कुठे, असा अफलातून सवाल केला. सोबतच, नायब राज्यपाल नजीब जंग यांच्या निर्देशांवरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच पत्र लिहिले आहे.
सरकारच्या घटनाबाह्य आदेशांचे पालन करू नका, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल. केजरीवाल सरकारच्या घटनाबाह्य आदेशांचे पालन केल्याने तिजोरीला जर आर्थिक नुकसान झाले, तर त्याची वसुलीदेखील दोषी अधिकार्‍यांकडून करण्यात येईल, असे नायब राज्यपालांनी दिल्ली प्रशासनातील अधिकार्‍यांना जारी केलेल्या आपल्या निर्देशात स्पष्ट केले.
यामुळे केजरीवालांचा तिळपापड झाला. दिल्लीला डेंग्यूने ग्रासले असताना केंद्र सरकार दिल्ली सरकारला काम करण्यापासून रोखत असल्याचा नेहमीसारखाच आरोप त्यांनी पुन्हा एकदा केला आणि पंतप्रधानांना पत्र लिहून नायब राज्यपालांची तक्रारही केली.
दुसरीकडे डेंग्यूशी लढा देण्याकरिता औषधे खरेदी करण्यासाठी महापालिकांनी दिल्ली सरकारकडे पैशाची मागणी केली असता, त्यांच्यावरही केजरीवालांनी संताप व्यक्त केला. इतक्या मोठ्या प्रमाणात निधी दिल्यानंतरही पैसा कुठे जातो, खाण्याची वृत्ती कधी सोडणार, असा सवाल त्यांनी केला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23879

Posted by on Sep 19 2015. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (1453 of 2452 articles)


=साडेसहा कोटी वर्षे जुनी अंडीही आढळली, संशोधकांचा दावा= इंदूर, [१८ सप्टेंबर] - मध्यप्रदेशच्या धार जिल्ह्यात डायनोसरच्या दोन अतिशय प्राचीन गुहा संशोधकांना ...

×