केजरीवालांचे वीजबिल ९१,०००
Wednesday, July 1st, 2015=आरटीआय अंतर्गत खुलासा=
नवी दिल्ली, [३० जून] – स्वत:ला आम आदमी म्हणवून घेणारे आणि साधेपणाचा आव आणणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे राहणीमान किती उच्च आहे, हे आज आरटीआय अंतर्गत उघड झालेल्या माहितीवरून स्पष्ट झाले. अरविंद केजरीवाल यांच्या सरकारी निवासस्थानाचे वीज बिल चक्क ९१ हजार रुपये आले. माहितीच्या अधिकारात मागविलेल्या माहितीत हे सत्य पुढे आले आहे. हे बिल एप्रिल आणि मे अशा दोन महिन्यांचे आहे. ही माहिती पुढे येताच विरोधी पक्षाने आम आदमी पार्टीवर टीकेची झोड उठविली आहे.
दिल्ली विधानसभेतील प्रमुख विरोधी पक्ष भारतीय जनता पार्टीने, हे वीज बिल यापेक्षाही जास्त असण्याची शक्यता व्यक्त करीत आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी आपापली वीज बिले सार्वजनिक करावी, अशी मागणी केली आहे. वकील आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक गर्ग यांनी यासंबंधीची माहिती मागविली होती. दरम्यान, याप्रकरणी दिल्ली सरकारने खरोखरच वीज खर्च झाली आहे की हे वीज बिल बनावट आहे, याविषयी चौकशीचे आदेश दिले आहेत.
Short URL: https://vrittabharati.in/?p=23170

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!