|
|
पंचांग Vrittabharati
मास : | वार : | तिथी :
नक्षत्र : | राशी :
करण : | योग :
सूर्योदय : 06:23 | सूर्यास्त : 18:37
अयनांश :
हवामान

किमान तापमान : 30.44° C

कमाल तापमान : 31.47° C

तापमान विवरण : scattered clouds

आद्रता : 63 %

वायू वेग : 6.46 Mps

स्थळ : Mumbai, IN

31.47° C

Weather Forecast for
Saturday, 30 Mar

26.59°C - 31.99°C

scattered clouds
Weather Forecast for
Sunday, 31 Mar

26.36°C - 29.62°C

sky is clear
Weather Forecast for
Monday, 01 Apr

26.21°C - 28.95°C

scattered clouds
Weather Forecast for
Tuesday, 02 Apr

25.5°C - 28.56°C

sky is clear
Weather Forecast for
Wednesday, 03 Apr

25.47°C - 29.11°C

sky is clear
Weather Forecast for
Thursday, 04 Apr

25.63°C - 28.83°C

scattered clouds
Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » केजरीवालांनंतर आता संजय सिंह यांचे स्टिंग

केजरीवालांनंतर आता संजय सिंह यांचे स्टिंग

=‘आप’मध्ये घमासान सुरूच, आरोप सिद्ध झाल्यास राजीनामा देण्याची तयारी=
SUNJAY SINGH-AAPनवी दिल्ली, [१२ मार्च] – इतर पक्षातील लोकांना अडकविण्यासाठी स्टिंग ऑपरेशन करण्यात हातखंडा असलेल्या आम आदमी पार्टीचे वरिष्ठ नेतेच आता या जाळ्यात अडकत चालले असून, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यानंतर पक्षाचे प्रवक्ते संजय सिंह यांचे एक स्टिंग समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली असून, यामुळे आपच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे.
दिल्लीत सरकार स्थापन करण्यासाठी संजय सिंह यांनी आपल्याला मंत्रिपदाचे आमिष दाखविले होते, असा आरोप कॉंग्रेस नेते आसिफ मोहम्मद यांनी केला. संजय सिंह यांनी आपल्यावरील आरोपांचे खंडन केले आहे. मात्र, संजय सिंह यांनी खंडन केल्यास आपण यासंंबंधीचे पुरावे सादर करू, असा इशारा मोहम्मद यांनी दिला आहे. मी आसिफ मोहम्मद यांना भेटायला गेलो होतो. परंतु, कधीही पैशांची देवाणघेवाण किंवा इतर आमिषाबाबत चर्चा झाली नाही. जर पैशाची देवाणघेवाण करण्याची बाब सिद्ध झाली तर मी राजकीय जीवनातून संन्यास घेईन, असे संजय सिंह यांनी आसिफ मोहम्मद यांच्या आरोपावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले.
याउलट आसिफ मोहम्मद हेच सरकार स्थापन करण्यासाठी आतुर झाले होते, असा प्रतिआरोपही संजय सिंह यांनी केला. यासाठी त्यांनी नितीन गडकरी, रामवीर विधुडी यांच्यासारख्या नेत्यांची भेट घेऊन चर्चाही केली. भाजपा आपल्याला उपमुख्यमंत्री बनविणार असल्याचे आसिफ मोहम्मद तेव्हा सांगत होते, असा दावाही संजय सिंह यांनी केला. हे लोक भाजपासोबत कशाप्रकारे सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील आहेत ही व्यूहरचना जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न होता, असेही संजय सिंह म्हणाले. सध्या पक्षात जे काही होत आहे त्यामुळे आपणही व्यथित आहे, असेही सिंह यांनी स्पष्ट केले.

Posted by : | on : 13 Mar 2015
Filed under : ठळक बातम्या, दिल्ली, राज्य
Author Description : .
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
You can leave a response or trackback to this entry

Related posts

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g