Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » केजरीवाल? अंह खुजलीवाल! : नक्वी

केजरीवाल? अंह खुजलीवाल! : नक्वी

mukhtar-abbas-naqviलखनौ, [२७ जून] – येथील प्रदेश भाजपा मुख्यालयात रविवारी आयोजित एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आपल्या भाषणातून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा ‘खुजलीवाल’ असा उल्लेख केला. सर्वच पक्ष भ्रष्टाचारी आहेत, असे म्हटल्याशिवाय केजरीवाल यांना चैन पडत नाही, असे सांगून त्यांना काम नाही तर फक्त गोंधळ घालायचा असतो, असेही ते पुढे म्हणाले.
१९७५ ते ७७ या आणिबाणीकाळात ज्यांनी लढा दिला त्यांचा सत्कार करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांना आमंत्रित करण्यात आले होते.
यावेळी केलेल्या भाषणातून नक्वी यांनी कॉंग्रेसमुक्त भारत करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचीही तारीफ केली. मोदी यांच्यामुळे आज भारताचे नाव देश-विदेशात मोठ्या आदराने घेतले जात असल्याचेही सांगून पारतंत्र्याच्या काळात म. गांधी यांनी केलेल्या आवाहनानंतर देशवासीयांनी विदेशी कपड्यांची होळी केली होती आणि आजच्या काळात पंतप्रधानांनी गॅस सबसिडी सोडण्याचे आवाहन केले असता देशवासीयांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे नक्वी यावेळी म्हणाले.
आणिबाणी लोकशाहीवरील काळा डाग
यावेळी आपल्या भाषणातून कॉंग्रेसवर टीका करताना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लागू केलेली १९७५ मधील आणिबाणी ही भारतीय लोकशाहीवरील कधीही न जाणारा काळा डाग असल्याचे सांगून या काळात लोकशाहीला नष्ट करून नागरिकांवर मोठ्या प्रमाणात अत्याचारही करण्यात आल्याने संधी मिळताच जनतेने कॉंग्रेसचे पतन केले, याकडेही नक्वी यांनी लक्ष वेधले.
उत्तरप्रदेशातील समाजवादी सरकारचाही खरपूस समाचार घेताना, त्या पक्षाचा आता बेंडबाजा वाजला असून आता ते सरकारही सत्तेवरून दूर होणार असल्याचे भाकीत नक्वी यांनी यावेळी वर्तवले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=28962

Posted by on Jun 28 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (174 of 2453 articles)


=शहरीकरणामुळे दारिद्र्य निर्मूलन शक्य: नरेंद्र मोदी= [gallery ids="28810,28811"] पुणे, [२५ जून] - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी पुण्यातून आपल्या ...

×