Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » केजरीवाल, आप नेत्यांनी माझी बदनामी केली

केजरीवाल, आप नेत्यांनी माझी बदनामी केली

=अरुण जेटली यांची कोर्टात माहिती=
Arun Jaitley3नवी दिल्ली, [५ जानेवारी] – दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेतील (डीडीसीए) माझ्या कारकीर्दीत एका पैशाचाही गैरव्यवहार झाला नसतानाही, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी माझ्यावर आणि कुटुंबीय सदस्यांवर बेजबादार व निराधार आरोप करून समाजात बदनामी केली आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज मंगळवारी स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयाने सांगितले.
डीडीसीएत अरुण जेटली यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप केजरीवाल आणि आपच्या पाच नेत्यांनी केल्यानंतर, तो फेटाळून लावताना अरुण जेटली यांनी या सर्व नेत्यांविरुद्ध १० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा केला. तो दाखल करून घेताना न्या. संजय खनगवाल यांच्या न्यायालयाने केजरीवाल, कुमार विश्‍वास, आशुतोष, संजय सिंह, राघव चढ्ढा आणि दीपक वाजपेयी यांना नोटीस जारी करून, जेटली यांची साक्ष नोंदविण्यासाठी ५ जानेवारी ही तारीख निश्‍चित केली होती. त्यानुसार, जेटली आज मंगळवारी न्यायालयात हजर झाले.
यावेळी आपली साक्ष देताना जेटली म्हणाले की, केजरीवाल आणि आपच्या नेत्यांनी माझ्यावर जे आरोप केले, ते पूर्णपणे निराधार असून, त्यामुळे समाजात माझी व कुटुंबाची प्रचंड बदनामी झाली आहे. या सरकारनेच गठित केलेल्या चौकशी आयोगाच्या अहवालातही माझे नाव नाही. प्रत्यक्षात, केजरीवाल यांच्यासोबत काम करणार्‍या एका उच्चपदस्थ अधिकार्‍याविरोधात सीबीआयने भ्रष्टाचारप्रकरणी धाडसत्र राबविल्यानंतर, चौकशीपासून लक्ष विचलित करण्यासाठीच केजरीवाल आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांनी असे आरोप केले.
यावेळी जेटली यांच्यासोबत काही केंद्रीय मंत्रीही होते. तथापि, त्यांना बाहेरच थांबावे लागले. न्यायालयीन परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. या प्रकरणी पुढील सुनावणी लवकरच होणार आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26433

Posted by on Jan 6 2016. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (935 of 2452 articles)


=पाक लष्कर प्रमुखांचा शरीफांना इशारा= नवी दिल्ली, [५ जानेवारी] - पंजाबच्या पठाणकोट हल्ल्यातील दहशतवादी हे पाकिस्तानचेच होते, हे सिद्ध करणारे ...

×