Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » केजरीवाल निर्लज्ज, कपटी आहेत

केजरीवाल निर्लज्ज, कपटी आहेत

=प्रशांत भूषण यांचे टीकास्त्र=
Prashant-Bhushanनवी दिल्ली, [१८ जुलै] – प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव आम आदमी पार्टीत परतल्यास आपल्यास आनंदच होईल, असे विधान करणारे दिल्लीचे मुुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे निर्लज्ज आणि कपटी आहेत, अशी खरमरीत टीका पक्षाचे माजी नेते प्रशांत भूषण यांनी केली आहे.
केजरीवाल यांनी आधी आम्हाला अतिशय घाणेरड्या शिव्या दिल्या आणि राष्ट्रीय परिषदेच्या आमदारांकरवी मारहाण करण्याचा प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर त्यानंतर पक्षविरोधी कारवायांच्या आरोपाखाली गेल्या एप्रिल महिन्यात पक्षातून काढून टाकले. त्यामुळे त्यांचे हे वक्तव्य निर्लज्जपणाचे आहे, असे प्रशां भूषण यांनी केलेल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.
आपचे माजी नेते योगेंद्र यादव यांनी केजरीवाल यांच्या या विधानाचा खरपूस समाचार घेतला आहे. आम्ही आमची तत्त्वे सोडलेली नाही. स्वच्छ राजकारणावर विश्‍वास असल्यानेच आम्ही स्वराज अभियान सुरू केले आहे. त्यामुळे आम्हाला परत घेण्यापेक्षा भरकटलेल्या केजरीवालांनी पुन्हा मूळ मार्गावर यावे, असे आवाहन यादव यांनी ट्विटरच्या माध्यमातून केले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23451

Posted by on Jul 19 2015. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (1550 of 2452 articles)


=मुख्यमंत्री आनंदीबेन यांनी केली रस्त्याची सफाई, मंगलारतीत अमित शहांची उपस्थिती= अहमदाबाद, [१८ जुलै] - भगवान जगन्नाथाच्या १३८ व्या रथयात्रेला आज ...

×