किमान तापमान : 27.18° C
कमाल तापमान : 27.72° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 73 %
वायू वेग : 2.04 Mps
स्थळ : Mumbai, IN
27.72° C
26.98°C - 28.39°C
broken clouds26.57°C - 28.93°C
scattered clouds26.48°C - 28.86°C
few clouds26.13°C - 28.12°C
sky is clear25.81°C - 27.96°C
sky is clear26.05°C - 28.43°C
sky is clear=मनीष सिसोदिया उपमुख्यमंत्री होणार=
नवी दिल्ली, [१२ फेब्रुवारी] – आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल दिल्लीचे नवे मुख्यमंत्री म्हणून शनिवार १४ फेब्रुवारीला रामलीला मैदानावर शपथ घेणार असून, आपल्या मंत्रिमंडळाची यादी गुरुवारी नायब राज्यपालांना सादर केली.
याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आले नसले तरी आपचे वरिष्ठ नेते मनीष सिसोदिया नव्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, असा अंदाज आहे. मंत्रिमंडळात सर्व जातीधर्माच्या लोकांना प्रतिनिधित्व मिळावे, असा केजरीवाल यांचा प्रयत्न आहे. दिल्ली विधानसभेच्या नियमानुसार मंत्रिमंडळात एकूण सदस्य संख्येच्या जास्तीतजास्त दहा टक्के म्हणजे ७ लोकांना स्थान देता येते.
सिसोदिया यांच्याशिवाय गोपाल राय, किरण बेदी यांना पराभूत करणारे ऍड. एस. के. बग्गा, आदर्श शास्त्री, इमरान हुसेन, जर्नेलसिंग यांचा समावेश होऊ शकतो. आदर्श शास्त्री हे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे नातू आहेत. विधानसभा अध्यक्षपदासाठी सोमनाथ भारती आणि रामनिवास गोयल यांच्या नावाची चर्चा आहे. केजरीवाल यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात महिला म्हणून राखी बिर्ला यांचा समावेश करण्यात आला होता. यावेळी अलका लांबा यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. वंदनाकुमारी यांना विधानसभेचे उपसभापती बनविले जाऊ शकते. आधीच्या मंत्रिमंडळातील काही जणांना वगळले जाण्याची शक्यता आहे.