Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » केजरीवाल सरकारचा आणखी एक भ्रष्टाचार उघड

केजरीवाल सरकारचा आणखी एक भ्रष्टाचार उघड

=अन्न पुरवठा मंत्र्याची हकालपट्टी, स्वच्छ प्रशासनाचा दावा फोल=
Kejriwal6नवी दिल्ली, [९ ऑक्टोबर] – आपल्या आम आदमी पार्टीत आणि सरकारमध्ये कुणीही कलंकित नाही, हा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा दावा दिवसेंदिवस फोल ठरत आहे. गंभीर गुन्ह्यात चार आमदारांना अटक झाल्यानंतर आता त्यांच्या सरकारमधील घोटाळाही उघडकीस आला आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री असीम अहमद खान यांचा भ्रष्टाचार चव्हाट्यावर यांची सरकारमधून हकालपट्टी करणे केजरीवालांना भाग पडले. सोबतच, या प्रकरणी सीबीआय चौकशीची शिफारसही त्यांनी केली.
स्वच्छ प्रशासनाचा आपला दावा आपलेच मंत्री व आमदार फोल ठरवित असल्याने मुख्यमंत्री केजरीवाल अक्षरश: तोंडघशी पडले आहेत. असीम खान एका बिल्डरकडून सहा लाख रुपयांची लाच मागत असताना, या बिल्डरनेच त्यांच्यातील संवाद टेप केला आणि ऑडिओ क्लिप केजरीवालांकडे सादर केले. ते तपासल्यानंतर केजरीवालांनी खान यांना मंत्रिमंडळातून लगेच बडतर्फ केले आणि सीबीआय तपासाची शिफारस केली.
भरगच्च पत्रपरिषदेत खान यांच्या हकालपट्टीची घोषणा करतानाच, केजरीवाल यांनी इम्रान हुसेन यांना या खात्याचे नवे मंत्री नियुक्ती जाहीर केली. खान यांनी मोतिया महल या आपल्या मतदारसंघात बिल्डरला इमारत बांधण्याची परवानकगी देण्यासाठी पैशाची मागणी केली होती. ती देतानाच, त्याचे ऑडिओ क्लिपही तयार करण्यात आले. गुरुवारी रात्री ते मला सोपविण्यात आले, अशी माहितीही केजरीवाल यांनी दिली.
भ्रष्ट असणारी व्यक्ती मंत्री, आमदार किंवा वरिष्ठ अधिकारी असो, आपण त्यांना माफ करणार नाही, असे सांगताना त्यांनी भाजपावर टीका केली. भाजपानेही आता भ्रष्टाचाराचे आरोप असलेले मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांची हकालपट्टी करावी, अशी मागणीही त्यांनी करून टाकली.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25076

Posted by on Oct 10 2015. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (1352 of 2452 articles)


=२००९ ते २०१३ या चार वर्षांमध्ये ११ अणू शास्त्रज्ञांचा गूढ मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती= नवी दिल्ली, [९ऑक्टोबर] - देशभरात २००९ ...

×