Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » केजरीवाल सरकारचा कांदा घोटाळा?

केजरीवाल सरकारचा कांदा घोटाळा?

=खरेदी १६, विक्री ४० रुपये दराने, म्हणे, वाहतुकीवर लागला इतका खर्च=
Kejriwal6नवी दिल्ली, [२० सप्टेंबर] – राजधानी दिल्लीत कांद्याने घराघरातील गृहिणींना रडविल्यानंतर, दिल्लीकरांना स्वस्तात कांदा उपलब्ध करून देण्याची घोषणा करणार्‍या अरविंद केजरीवाल सरकारचा कथित कांदा घोटाळा आरटीआयच्या माध्यमातून उघडकीस आला आहे. नाफेडसारख्या विपणन संस्थांकडून १६ रुपये प्रति किलो कांद्याची खरेदी केल्यानंतर सरकारने आपल्या स्वस्त दुकानांमधून हाच कांदा चक्क ४० रुपये दराने विकला आहे. हा घोटाळा चव्हाट्यावर येताच, कांद्याच्या वाहतुकीसाठी सरकारला इतका खर्च लागल्याचा अफलातून दावाही सरकारतर्फे करण्यात आला.
गेल्या अनेक महिन्यांपासून केवळ दिल्लीकरांनाच नव्हे, तर देशभरातील सर्वसामान्यांना कांद्याच्या वाढत्या किमतीने रडविले आहे. गेल्या महिन्यात ८० रुपये किलो असलेला कांदा आता किरकोळ बाजारात ५० रुपये किलो या दराने विकला जात आहे. आम्ही दिल्लीकरांना अतिशय स्वस्तात कांदा देऊ, अशी घोषणा केजरीवाल यांच्या सरकारने केली. याच अनुषंगाने सरकारी संस्थांनी काही विपणन संस्थांकडून कांदा खरेदी केला. सरकारला प्रतिकिलो कांद्यासाठी अवघे १६ रुपयेच मोजावे लागले. फार तर दिल्लीकरांना तो २० किंवा २२ रुपये प्रतिकिलो दराने मिळेल, अशी अपेक्षा होती. पण, एक किलो कांद्यासाठी येथील जनतेला ४० रुपये मोजावे लागले.
एका वृत्तवाहिनीने माहिती अधिकार कायद्याचा आधार घेत, दिल्ली सरकारने प्रति किलो कांद्यासाठी नेमके किती रुपये मोजले, हे जाणून घेतले असता, वस्तुस्थिती समोर आली. आपला कांदा घोटाळा उजेडात आला असल्याचे लक्षात येताच, सरकारने मात्र मालाची वाहतूक आणि साठवणुकीवर जास्त पैसा खर्च झाल्यानेच तो ४० रुपये किलो विकणे भाग पडले, असे उत्तर दिले. तर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी हा कांदा केंद्र सरकारकडून ४० रुपये किलो या दराने खरेदी केला असून, आम्ही तो नुकसान सहन करून दिल्लीकरांना केवळ ३० रुपये प्रति किलो या दराने विकला असल्याचा दावा केला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=23956

Posted by on Sep 21 2015. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (1436 of 2452 articles)


=पाक, चीन सीमेवरील स्थितीचा घेणार आढावा= नवी दिल्ली, [२० सप्टेंबर] - केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह उद्या सोमवारपासून तीन दिवस सीमावर्ती भागांचा ...

×