Home » ठळक बातम्या, दिल्ली, राज्य » केजरीवाल सरकार नव्या संकटात

केजरीवाल सरकार नव्या संकटात

=विधिमंत्र्याची शैक्षणिक पदवीच निघाली बोगस, हायकोर्टाने दिले चौकशीचे आदेश=
kejriwal arvindनवी दिल्ली, [२८ एप्रिल] – स्वच्छ राजकारण, प्रामाणिक आणि पारदर्शक व्यवहार अशा मोठमोठ्या गप्पा मारून दिल्लीच्या राजगादीवर विराजमान झालेल्या अरविंद केजरीवाल यांची आम आदमी पार्टी आणि त्यांचे सरकार आता नव्या वादात अडकले आहे. केजरीवाल सरकारमधील विधिमंत्री जितेंद्रसिंह तोमर यांची कायद्याची पदवीच बोगस निघाल्याने दिल्लीच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
तोमर यांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करताना आपण विधि विषयातील पदवीधर असल्याचे सांगताना तसे प्रमाणपत्रही व पदवीही जोडली होती. बिहारमधील ज्या विद्यापीठातून आपण ही पदवी घेतल्याचा दावा त्यांनी केला होता, त्याच विद्यापीठाने तोमर यांचा खोटारडेपणा चव्हाट्यावर आणला आहे.
आमच्या विद्यापीठात तोमर यांच्या शैक्षणिक पात्रतेची कोणतीही नोंद नसून, त्यांनी सादर केलेले पदवीविषयक प्रमाणपत्र बनावट असल्याचे विद्यापीठाने दिल्ली उच्च न्यायालयात स्पष्ट केले. यातही धक्कादायक म्हणजे, तोमर यांनी एक नव्हे, तर चक्क दोन स्वतंत्र विद्यापीठाच्या पदव्या घेतल्याचा दावा केला होता. मात्र, प्रत्यक्षात त्यांच्याकडे या दोनपैकी एकाही विद्यापीठाची पदवी नसल्याचे समोर आले आहे.
बोगस कायद्याच्या पदवीच्या आधारे तोमर यांनी वकिली करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या बार कौन्सिलकडे नाव दाखल केल्याचा आरोप झाल्यानंतर बिहारच्या भागलपूर विद्यापीठाने न्यायालयात चौकशी अहवाल सादर केला. तोमर यांनी आपल्या पदवी प्रमाणपत्रावर जो अनुक्रमांक दिला, तो क्रमांक अन्य एका व्यक्तीचा आहे. तोमर यांच्याविषयी आमच्याकडे कोणतीही नोंद नसल्याने त्यांनी सादर केलेली पदवी बनावट असल्याचे विद्यापीठातर्फे न्यायालयात स्पष्ट करण्यात आले.
विधिशाखेची पदवी बोगस असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तोमर यांनी उत्तरप्रदेशच्या डॉ. राम मनोहर लोहिया अवध विद्यापीठातून प्राप्त केलेली विज्ञान शाखेची पदवीही बोगस असल्याचेच सिद्ध झाले आहे. यासंदर्भात उच्च न्यायालयाने डॉ. राम मनोहर लोहिया अवध विद्यापीठाला अहवाल सादर करण्यास सांगितले होते. तोमर यांनी या विद्यापीठातून विज्ञान शाखेची पदवी घेतल्याचा दावा केला होता. मात्र, प्रत्यक्षात अवध विद्यापीठानेही तोमर यांची पदवी बोगस असल्याचे दिल्ली बार असोसिएशनला कळवले आहे. आता हा अहवाल लवकरच न्यायालयात सादर होणार आहे. दरम्यान, आपल्याविरोधात हा कट असून, आपण कोणताही बनावटपणा केला नाही. माझ्यावरील आरोप सिद्ध झाल्यानंतरच मी राजीनामा देईल, अशी भूमिका तोमर यांनी घेतली आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=22370

Posted by on Apr 29 2015. Filed under ठळक बातम्या, दिल्ली, राज्य. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, दिल्ली, राज्य (1735 of 2452 articles)


=१९.६ अब्ज डॉलर्स इतकी संपत्ती, दिलीप संघवी मागे पडले= मुंबई, [२८ एप्रिल] - रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा आणि प्रख्यात उद्योगपती ...

×