Home » आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या » के.पी. शर्मा ओली नेपाळचे नवे पंतप्रधान

के.पी. शर्मा ओली नेपाळचे नवे पंतप्रधान

=सुशील कोईराला यांचा पराभव=
Kp-sharma-oliकाठमांडू, [११ ऑक्टोबर] – के. पी. शर्मा ओली यांची आज रविवारी नेपाळचे नवे पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली. हिंसाचारासाठी कारणीभूत ठरलेल्या नेपाळच्या नव्या घटनेवर राजकीय मतैक्य होऊ न शकल्याने अनिवार्य झालेल्या निवडणुकीत ओली यांनी विद्यमान पंतप्रधान सुशील कोईराला यांचा पराभव केला.
संसद भवनात घेण्यात आलेल्या निवडणुकीत सीपीएल-युएमएलचे अध्यक्ष ओली यांना ३३८ मते मिळाली. तर, कोईराला यांना २४९ मते मिळाली. या निवडणुकीत विजयी होण्यासाठी २९९ मतांची गरज होती. मतदान अनिवार्य असल्याने सर्वच ५८७ सदस्यांनी या निवडणुकीत मतदान केले. कोली यांना अनेक राजकीय पक्षांचे समर्थन प्राप्त झाले होते.
२००६ च्या लोकचळवळीनंतर देशात स्थापन झालल्या गिरीजाप्रसाद कोईराला यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारमध्ये ओली हे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री होते. याशिवाय, १९९४ मधील मनमोहन अधिकारी यांच्या सरकारमध्ये ते गृहमंत्रीही होते.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25102

Posted by on Oct 11 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, आशिया, ठळक बातम्या (1350 of 2458 articles)


नवी दिल्ली, [११ ऑक्टोबर] - संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून देशातच विकसित करण्यात आलेल्या आणि समुद्रातील सर्वच चाचण्या यशस्वीपणे पार ...

×