Home » ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण » कॉंगे्रसची भूमिका पाकला ऑक्सिजन देणारी

कॉंगे्रसची भूमिका पाकला ऑक्सिजन देणारी

=पोरबंदर समुद्रातील घटना. भाजपाचा जोरदार पलटवार=
Sambit Patraनवी दिल्ली, [४ जानेवारी] – पोरबंदरच्या समुद्रात पाकी नौका आल्याच्या घटनेला भाजपा उगाच महत्त्व देत आहे, अशी टीका करणार्‍या कॉंगे्रसवर भाजपाने आज रविवारी जोरदार पलटवार केला. कॉंगे्रसने आता दहशतवादावरही राजकारण सुरू केले आहे. या पक्षाची भूमिका पाकिस्तानला ऑक्सिजन देणारीच आहे, असा आरोप भाजपाने केला.
गेल्या शुक्रवारी स्फोटकांनी भरलेली पाकची नौका पोरबंदरच्या समुद्रात आल्यानंतर तटरक्षक दलाच्या जवानांनी पाठलाग करून तिला रोखले होते. यानंतर नौकेतील चौघांनी स्फोट घडवून नौका समुद्रात बुडवली होती. याच घटनेचा धागा पकडून कॉंगे्रस प्रवक्ते आनंद कुमार यांनी, सरकार या घटनेला उगाच महत्त्व देत आहे. सोबतच, या प्रकरणी सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही केली होती.
भाजपाने आज रविवारी कॉंगे्रसवर पलटवार केला. भाजपा प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, भारतीय राजकारणाने आता नीचांकी पातळी गाठली आहे आणि यासाठी केवळ कॉंगे्रस पक्षच जबाबदार आहे. तटरक्षक दल आणि गुप्तचर संस्थांनी २६/११ सारख्या हल्ल्याची पुनरावृत्ती यशस्वीपणे रोखल्यानेच आपण नववर्षाचे आनंदाने स्वागत करू शकलो. या घटनेमागे पाकचाच हात असल्याचे पुरावे मिळाल्यानंतरही कॉंगे्रस पक्ष या मुद्याचे राजकारण करीत आहे. तसे पाहता या पक्षाने अशा गंभीर स्थितीत सरकारच्या पाठीशी उभे राहायला हवे आणि अतिरेक्यांचा डाव हाणून पाडणार्‍यांचे अभिनंदन करायला हवे होते. पण, दुर्दैवाने तसे झाले नाही. उलट, पाकची बाजू घेणारे वक्तव्य हा पक्ष करीत आहे. पाक आणि कॉंगे्रस प्रवक्त्याने या प्रकरणी जे वक्तव्य केले, त्यात काहीच फरक नाही, असा आरोप पात्रा यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला.

Short URL: https://vrittabharati.in/?p=19466

Posted by on Jan 5 2015. Filed under ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राष्ट्रीय, संरक्षण (2283 of 2453 articles)


रॉबर्ट वढेरांना झटका राजस्थान सरकारची कणखर भूमिका बिकानेर, [४ जानेवारी] - एका पैशाचीही गुंतवणूक न करता जमीन खरेदी करणारे ...

×