Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » कॉंग्रेसचे नेतृत्व करण्यास सोनियाच समर्थ

कॉंग्रेसचे नेतृत्व करण्यास सोनियाच समर्थ

=संदीप दीक्षित यांचे मत=
Sonia_Rahulनवी दिल्ली, [६ एप्रिल] – राहुल गांधी यांच्याकडे कॉंग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे सोपविण्याची जय्यत तयारी सुरू असतानाच, कॉंग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी राहुल गांधींची क्षमता आणि त्यांच्या अनुपस्थितीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे. माझ्या मते, आज कॉंग्रेस ज्या स्थितीत आहे, त्याकडे बघता पक्षाचे नेतृत्व करण्याची क्षमता केवळ सोनिया गांधी यांच्यातच आहे, अशी भूमिका दीक्षित यांनी विशद केली.
गेल्या एक महिन्यापासून सुटीवर असलेले राहुल गांधी यांचा पुढील महिन्यात राज्याभिषेक होणार असल्याचे संकेत अनेक नेत्यांनी दिले आहेत. त्यांच्याकडे पक्षाची धुरा सोपविण्यास काही नेते अनुकूल आहेत, तर काहींचा तीव्र विरोध आहे. अशा स्थितीत संदीप दीक्षित यांच्या भूमिकेमुळे पक्षात नवे वादळ उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दीक्षित म्हणाले की, मला राहुल गांधी यांच्या क्षमतेविषयी बोलायचे नाही. पण, ते ज्या पद्धतीने गेल्या एक महिन्यापासून अनुपस्थित आहेत, त्यावरून ते पक्षाच्या भवितव्याबाबत फारसे गंभीर नाही, असे मला स्पष्टपणे वाटते आणि जेव्हा पक्षाचे नेतृत्व करण्याचा प्रश्‍न उपस्थित होतो, तेव्हा सोनियांसोबत कुणाचीही तुलना करणे शक्य नाही, असे दीक्षित म्हणाले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=21909

Posted by on Apr 7 2015. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (1817 of 2453 articles)


=मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन, घुमान साहित्य संमेलनाचा थाटात समारोप= घुमान, [५ एप्रिल] - आजचे युग हे डिजिटायझेशनचे युग आहे. ...

×