Home » ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय » कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी?

कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी?

Rahul-Gandhi3नवी दिल्ली, [२ जानेवारी] – कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या खाद्यांवर लवकरच पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी येऊ शकते. पुढील आठवड्यात आपली सुटी संपवून मायदेशी परतल्यानंतर या पदावर विराजमान होऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ८ जानेवारी रोजी कॉंग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पक्षांतर्गत निवडणुकीची प्रक्रियेविषयी निर्णय होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात राहुल गांधी यांनी काही दिवसासाठी युरोपला जात असल्याची माहिती टि्‌वटरद्वारे दिली होती. पुढील आठवड्यात राहुल गांधी परतणार आहे. त्यानंतर या निवडणुकांच्या प्रक्रियेला वेग येणार आहे.
दरम्यान, राहुल गांधी अध्यक्षपदासाठी तयार आहेत का ? याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता दिली नाही. राहुल गांधींकडे अध्यक्षपदाची जबाबदारी दिली पाहिजे, असे पक्षाचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह काही दिवसांपूर्वीच सांगितले होते. मात्र, याबाबता अंतिम निर्णय सोनिया गांधी घेतील असे स्पष्ट करण्यात आले आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=26370

Posted by on Jan 3 2016. Filed under ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in ठळक बातम्या, राजकीय, राष्ट्रीय (953 of 2453 articles)


=४ दहशतवादी ठार, २ जवान शहीद= पठाणकोट, [२ जानेवारी] - जम्मू - पठाणकोट महामार्गावरील भारतीय लष्कराच्या हवाई तळावर काल रात्री ...

×