किमान तापमान : 28.31° C
कमाल तापमान : 28.95° C
तापमान विवरण : few clouds
आद्रता : 81 %
वायू वेग : 3.37 Mps
स्थळ : Mumbai, IN
28.31° C
27.91°C - 31.32°C
sky is clear28.01°C - 31.15°C
sky is clear28.15°C - 31.41°C
sky is clear28.67°C - 32.91°C
few clouds29.17°C - 33.14°C
sky is clear29.18°C - 33.01°C
sky is clear=२८ मार्चपर्यंत बहुमत सिद्ध करा: राज्यपालांचे रावत यांना निर्देश=
देहराडून, [१९ मार्च] – कॉंगे्रसच्या नऊ आमदारांनी बंडखोरी केल्याने अल्पमतात आलेले मुख्यमंत्री हरीश रावत यांना येत्या २८ मार्चपर्यंत आपल्या सरकारचे बहुमत सिद्ध करण्याचे आदेश राज्यपाल डॉ. कृष्णकांत यांनी आज शनिवारी दिले.
या बंडखोर आमदारांनी भाजपाला पाठिंबा दिल्यानंतर भाजपाने राज्यात सरकार स्थापन करण्याचा दावा सादर केला. यामुळे रावत सरकार चांगलेच अडचणीत आले आहे.
तत्पूर्वी, रावत यांनी राज्यपालांची भेट घेतली आणि राज्यातील स्थितीची माहिती दिली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना रावत म्हणाले की, माझ्याकडे अजूनही बहुमत आहे आणि माझ्या सरकारला कुठलाही धोका नाही. तथापि, मी राज्य विधानसभेत विश्वासमत हरलो, तर त्याचक्षणी मी पदाचा राजीनामा देईन.
आमच्याकडे ३५ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा भाजपाकडून केला जात आहे. प्रत्यक्षात भाजपा जनतेची दिशाभूल करीत आहे. कारण, बहुमत केवळ माझ्याजवळ आहे आणि ते मी सिद्ध करणार आहे.