Home » आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप » कॉंग्रेसनेत्यांच्या स्विस बँकेतील खात्याची चौकशी

कॉंग्रेसनेत्यांच्या स्विस बँकेतील खात्याची चौकशी

=भारताकडून सहकार्याची मागणी=
swissaccounts1बर्न (स्वित्झर्लंड), [२४ नोव्हेंबर] – कॉंग्रेस नेत्या व माजी केंद्रीय मंत्री प्रणीत कौर आणि त्यांचे पुत्र रानिंदरसिंग यांच्या स्विस बँकेतील खात्यांच्या चौकशीसाठी सहकार्य करण्याची मागणी भारताने केली असल्याची माहिती स्वित्झर्लंड सरकारने दिली आहे.
भारतातील कर यंत्रणा स्विस बँकांत खाती असलेल्या भारतीय नागरिकांची चौकशी करीत आहेत. या पार्श्‍वभूमीवर प्रणीत कौर आणि रानिंदरसिंग यांच्या खात्यांची चौकशीसाठी सहकार्य करण्याची विनंती भारताकडून करण्यात आल्याचे स्वित्झर्लंड सरकारने म्हटले आहे. स्वित्झर्लंड सरकारच्या नियमानुसार करांच्या मुद्यांवर सहकार्य करताना खाते आणि इतर आर्थिक तपशील देण्यात येतात. मात्र, फेडरल टॅक्स ऍडमिनिस्ट्रेशन अंतर्गत प्रणीत कौर आणि रानिंदरसिंग हे या प्रकरणावर दहा दिवसांत आक्षेप घेऊ शकतात. त्यांनी याबाबतीत दहा दिवसात म्हणणे मांडावे, असे स्वित्झर्लंड सरकारने म्हटले आहे.
याबाबतची सूचना सरकारच्या परिपत्रकात जाहीर करण्यात आली आहे. या सूचनेत दोघांची नावे, राष्ट्रीयत्व आणि वय या व्यतिरिक्त कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. मात्र कौर आणि त्यांच्या पुत्राने या मुद्यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेेली नाही. याआधी एचएसबीसी बँकेतील खातेदारांची यादी जाहीर झाल्यानंतर कौर यांनी परदेशी बँकेत खाते असल्याचे अमान्य केले होते. आतापर्यंत स्वित्झर्लंडने तेथील बँकांत खाती असलेल्या १२ पेक्षा अधिक भारतीयांची नावे जाहीर केली असून, भारताकडून करण्यात आलेल्या अनेक मागण्यांवर प्रक्रिया करण्यात येत आहे.

Short URL: https://vrittabharati.in/?p=25709

Posted by on Nov 24 2015. Filed under आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in आंतरराष्ट्रीय, ठळक बातम्या, युरोप (1165 of 2458 articles)


=विधानसभेच्या दोन जागा भाजपाने जिंकल्या= इम्फाळ, [२४ नोव्हेंबर] - मणिपूर विधानसभेसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत भाजपाने चक्क दोन जागांवर विजय मिळविला. ...

×