Home » अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय » कॉंग्रेसशासित राज्यांनाही हवेय् जीएसटी: जेटली

कॉंग्रेसशासित राज्यांनाही हवेय् जीएसटी: जेटली

Arun Jaitley9नवी दिल्ली, [१७ मार्च] – कॉंग्रेसशासित राज्यांसह सर्वच राज्यांना वस्तू व सेवाकर कायदा अर्थात जीएसटी हवा आहे, असा दावा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी येथे केला.
कॉंग्रेसशासित राज्येही जीएसटीच्या बाजूने आहेत. लोकसभेत सर्वच पक्षांनी जीएसटीच्या बाजूने मतदान केले. फक्त कॉंग्रेसने यावेळी सभात्याग केला. आजही कॉंग्रेसने पुढाकार घेऊन जीएसटीवर सरकारशी चर्चा करावी, असे आवाहन अरुण जेटली यांनी इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना केले. भारतीय अर्थव्यवस्था दुहेरी आकड्यातील विकास दर गाठण्यास सक्षम आहे, असा दावा करताना जेटली यांनी हा विकास दर कशाप्रकारे गाठता येऊ शकतो, याची सविस्तर माहिती दिली. देशात कृषी क्षेत्रात विकासाला सर्वात जास्त वाव आहे. काही राज्यांनी कृषी क्षेत्राच्या विकासात खूप मोठी मजल मारली आहे. गुजरातसारख्या राज्याने दुधाचे उत्पादन वाढवून यामध्ये मोठे योगदान दिले आहे. कृषी क्षेत्रात उत्पन्न दुप्पट करणे अवघड असले तरी अशक्य नाही, असेही जेटली म्हणाले.
गेल्या शंभर वर्षात कधीही सलग दोन वर्षे मान्सून खराब राहिला नाही. परंतु, गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी मान्सून चांगला राहील, अशी अपेक्षा आहे. सरकारने या अर्थसंकल्पात ग्रामीण भागावर विशेष लक्ष केंद्रित करून अगदी योग्यच केले आहे, असेही जेटली म्हणाले. ग्रामीण क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्याची आज नितांत गरज होती. भारत अनेक क्षेत्रांमध्ये सुधारणा करू शकतो, असेही जेटली म्हणाले.
बँका मल्यांकडून पैसा वसूल करतील
सार्वजनिक बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज थकवणारे मद्यसम्राट विजय माल्या यांच्यामुळे देशाचे नाव खराब झाले, असे सांगताना बँका मल्यांकडून एकेक पैसा वसूल करतील, असे जेटली यांनी स्पष्ट केले. मल्यांच्या प्रकरणात तथ्य स्पष्ट आहे. सर्व सरकारी संस्था मल्यांविरोधात कठोर पावले उचलतील आणि बँका माल्यांकडून प्रत्येक पैसा वसूल करतील, असेही जेटली यांनी यावेळी स्पष्ट केले.

Short URL: https://vrittabharati.in/?p=27395

Posted by on Mar 18 2016. Filed under अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in अर्थ, ठळक बातम्या, राष्ट्रीय (632 of 2453 articles)


मुंबई, [१७ मार्च] - पुण्यातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणी आरोपी मिर्झा हिमायत इनायत बेग याला ठोठावलेली फाशीची शिक्षा मुंबई उच्च ...

×